26 November 2020

News Flash

“मुक्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसैन यांनी केलं तर ‘लव्ह’, इतरांनी केलं तर लव्ह जिहाद”

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

संग्रहीत

मुक्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांनी केलं तर लव्ह आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने गळे काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा असाही टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहाद विरोधात कायदा आणत आहेत. यामुळे महाराष्ट्रातही असा कायदा आणला जावा अशी मागणी भाजपाने केली आहे. त्यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

आजच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी केली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका करत थोडी तरी लाज बाळगा असंही म्हटलं आहे. मुक्तार अब्बास नक्वी यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केलं तर ते लव्ह आणि इतरांनी केलं तर ते लव्ह जिहाद असं ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

काय म्हणाल्या आहेत मुंबईच्या महापौर?

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 8:35 pm

Web Title: congress spokesperson sachin sawant slams bjp on love jihad issue scj 81
Next Stories
1 हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळे ओवेसींवर आजवर कधीही हल्ला झालेला नाही-फडणवीस
2 “भाजपाला हल्ली ‘जय’ आणि ‘नाथ’ चालत नाहीत”; धनंजय मुंडेंचा टोला
3 कौतुकास्पद! स्थलांतरित मुलांसाठी रस्त्यावरच भरते शाळा
Just Now!
X