News Flash

रामटेक, चंद्रपूरमध्ये काँग्रेसतर्फे नवीन चेहऱ्याला संधी

अविनाश पांडे यांचे संकेत

अविनाश पांडे

अविनाश पांडे यांचे संकेत

नागपूर : काँग्रेसने चंद्रपूर, रामटेकचे उमेदवार जाहीर केले नाहीत.  सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी गेल्यावेळी रामटेकमधून निवडणूक लढवली होती, तेच ठरवतील त्यांना कुठून लढायचे, असे काँग्रेस नेते व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगून या दोन्ही मतदारसंघात अंतिम क्षणी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली.

पांडे आज नागपुरात  पत्रकारांशी चर्चा करीत होते. त्यांनी काँग्रेसमधील गटाबाजीचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत सर्वाना पसंत पडतील आणि जिंकून येण्याची क्षमता असेल, असा उमेदवार पक्षश्रेष्ठी देत आहेत, असा दावाही त्यांनी केला. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि नरेश पुगलिया हे दोन गट समोरासमोर आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, काँग्रेसमध्ये लोकशाही आहे.

प्रत्येकजण आपले मत व्यक्त करीत असतो, परंतु सर्वच नेते आणि कार्यकर्ते पक्षासाठी एकत्र येतात आणि काम करतात. पुगलिया यांचे चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजकारण संपुष्टात आले का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले, राजकारणात कोणीही संपत नसते, असे पांडे म्हणाले.

मुकुल वासनिक २००९ मध्ये रामटेकमधून विजयी झाले होते.  २०१४ ला पराभूत झाले, परंतु यावेळी ते येथून लढण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीत.

यासाठी केदार विरोध कारणीभूत आहे का असे पांडे यांना विचारले असता त्यांनी याची कल्पना नाही, पण मतदारसंघ निवडण्याचे स्वातंत्र्य मुकुल वासनिक यांना पक्षाने दिले आहे, असे  उत्तर दिले.  पटोले यांनी नागपूरहून उमेदवारी मागितली नव्हती. शहरातील राजकीय स्थिती बघता पक्षाच्या उच्चस्तरीय चर्चेत नाना पटोले यांचे नाव समोर आले. त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना सहकार्य करेल, असे पांडे म्हणाले.

‘‘नागपूर शहरात काँग्रेसचा मोठा मतदारवर्ग आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे दलित, मुस्लीम समजात असंतोष आहे. हलबा समाजही दुखावला गेला आहे. हा वर्ग काँग्रेसला साथ देईल तसेच पटोलेंमुळे बहुजन समाज परत काँग्रेसकडे वळेल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:52 am

Web Title: congress to give opportunity for new face in ramtek chandrapur constituency
Next Stories
1 सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
2 निवडणूक काळात राज्यात ‘स्वाईन फ्लू’चा विळखा!
3 लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मोदी वर्धेतून फोडणार
Just Now!
X