News Flash

Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस

सोशल व्हायरल टूलकिट प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापू लागला आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात राष्ट्रीय, तसेच राज्यातल्या नेत्यांकडून देखील खुलासे आणि प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यासंदर्भात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यााठी काँग्रेस पक्ष इतका उतावीळ का झाला आहे?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.

“वेगळी विचारसरणी असू शकते, पण…”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून काँग्रेसवर टूलकिट प्रकरणावरून निशाणा साधला आहे. “आपल्या सर्वांमध्ये वैचारिक मतभेद अशू शकतात. वेगळ्या विचारसरणी, मतं आणि श्रद्धा असू शकतात. पण काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे? काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

“भाजपा खोटारडा, विखारी, कांगावाखोर पक्ष”, Toolkit प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड!

देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यानंतर काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर दिलं असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये आगपाखड केली आहे. “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

“पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र”; काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा भाजपाचा आरोप

दरम्यान, राज्यातल्या नेत्यांसोबतच, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतेमंडळींकडून देखील व्हायरल होत असलेलं टूलकिट बनावट असल्याची भूमिका मांडली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट करून आपली भूमिका मांडली आहे.

 

नेमकं काय म्हणाल्या प्रियांका गांधी, वाचा सविस्तर!

“खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा”, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे. तसेच हे टूलकीट फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टूलकीटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 10:10 pm

Web Title: congress toolkit exposed bjp devendra fadnavis targets on indian strain word pmw 88
Next Stories
1 चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणातील हापूसचा हंगाम संपुष्टात
2 Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात ५२,८९८ रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर!
3 वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू
Just Now!
X