03 June 2020

News Flash

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होईल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचा राज्यातील महाजनादेश यात्रेचा वर्ध्यात आज दुसरा दिवस आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी विधानसभा निवडणुकीत वर्ध्यातील चारही जागा भाजपा जिंकेल असा विश्वास व्यक्त करताना या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा महाजनादेश यात्रेचा वर्ध्यात आज दुसरा दिवस होता. यावेळी उपस्थित जनतेसमोर त्यांनी गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आणि भाजपाला जनादेश देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या जनादेश यात्रेला लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे, हा प्रतिसाद म्हणजे केलेल्या कामांची पावती आहे. त्यामुळे जर तुम्ही भाजपाला विधानसभा निवडणुकीत महाजनादेश दिला तर आम्ही तुम्हाला महाविकास देऊ, असे आश्वासन त्यांनी वर्ध्यातील जनतेला दिले.

समृद्धी महामार्गामुळे विकासाचा मार्ग खुला होऊन या भागात क्रांती होईल. वर्ध्यातील ४५ हजार लोकांची कर्जे अजूनही माफ करायची बाकी आहेत, त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गरीब जनता, शेतकरी आणि कामगार, शेतमजुरांच्या कल्याणाकरीता काम करणारे आमचे सरकार असून गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, अशाच पद्धतीने आमचे काम सुरु राहिल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करु शकलं नाही. ग्रामसडक योजनेतून ३० हजार किमीचे रस्ते आम्ही तयार केले पाच वर्षांतला हा देशातील विक्रम आहे. यापूर्वी पाच वर्षात केवळ ३,००० गावांना पिण्याच्या पाण्याची योजना मिळायची मात्र, आम्ही १८ हजार गावात पिण्याच्या पाण्याची योजना पोहोचवली. शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर आणले, अशा प्रकारे आपल्या पाच वर्षांतल्या कामांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2019 12:21 pm

Web Title: congress will be washout in assembly elections says cm fadnvis aau 85
Next Stories
1 भाजपामध्ये मेगाभरती नाही, लिमिटेड भरती – मुख्यमंत्री
2 EVM विरोधात एकवटणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज-मुख्यमंत्री
3 “साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही”
Just Now!
X