जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता राजन पांडुरंग पाटील (४८) याने ठेकेदार अनिल गवस यांच्याकडून १७ हजार ५०० रुपयांची लाच गुरुवारी रात्री स्वीकारली म्हणून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता २३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. दोडामार्ग तालुक्यातील तेरवणे मेठे येथे समाज मंदिराचे काम ठेकेदार अनिल गवस यांनी पूर्ण केले होते. त्यापोटी सुमारे दोन लाख रुपयांची बिले उपअभियंता राजन पाटील देण्यास टाळाटाळ करीत होते. याशिवाय ठेकेदार अनिल गवस यांची आणखीदेखील बिले होती. दोडामार्ग जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता म्हणून राजन पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांचा पदभार पाटील यांच्याकडे होता. ठेकेदारांना बिलापोटी तो कायमच नाचवीत होता, अशा तक्रारी असतानाच अनिल गवस यांच्याकडे १७ हजार ५०० रुपये आणून दिल्यावर बिल देणार असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले होते.
तेरवण मेठे समाजमंदिर दुरुस्तीचे बिल देण्यासाठी वारंवार त्रास देणाऱ्या राजन पाटील यांच्या या त्रासाला कंटाळून ठेकेदार अनिल गवस यांनी लाचलुचपत विभागात संपर्क साधला. लाचलुचपत ठाण्याचे अधीक्षक दत्तात्रय कराळे व उपपोलीस अधीक्षक घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपअधीक्षक मुकुंद हातोटे, केणी, गवळी आदींनी संध्याकाळीच सापळा रचला. सावंतवाडीत गुरुवारी दुपारपासून सापळा रचूनही उपअभियंता राजन पाटील हुलकावणी देत होता. रात्री त्याने पोलीस लाइनमध्ये बहिणीकडे भाऊबिजेला आहे तेथे बोलावले असता रात्री १०.३५ वा. पाटील याला १७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. न्यायालयात राजन पाटील याला हजर केला असता सोमवार, २३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. तेरवण मेठे येथील हरिजनवाडी येथे लक्ष्मण गवस यांनी समाज मंदिर बांधण्याचा ठेका घेतला होता. सदरचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यावर पाटील यांनी झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे १७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. सावंतवाडी विश्रामगृहात गुरुवारी रात्री पाटील यांना आणले असता काँग्रेसचे बाळा गावडे, राजू निंबाळकर, सहराजकीय पदाधिकारी उपस्थित होते