करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या ‘सॅनिटायझर’ची निर्मिती वसंतदादा साखर कारखान्याने सुरू केली असून शनिवारपासून याचे मोफत वितरणही सुरू केले.

सॅनिटायझरची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या अल्कोहोलपासून निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत वसंतदादा साखर कारखान्याने याचे उत्पादन केले असून या उत्पादनास जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे. ५०० मिली आणि ५ लिटरच्या परिमाणामध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले असून याचे वाटप आज कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पोलिसांना केले. यावेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा उपस्थित होते. या सॅनिटायझरचे पोलिसांसह शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना  मोफत वाटप करण्यात येणार आहे. विशालदादा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमार्फत केले जाणार असून सध्या रोज ५०० बॉटलचे उत्पादन होत असून गरज भासल्यास अधिक उत्पादन करण्याची कारखान्याची सिध्दता असल्याचे सांगण्यात आले.शाल पाटील.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production
साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना