18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा चालक जागीच ठार

अपघातामुळे वाहतूक कोंडी

पालघर | Updated: July 21, 2017 10:19 AM

अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन मोठ्या कंटेनरमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये कंटेनरला लागलेल्या आगीत एका कंटेनरमधील चालक ठार झाला आहे. पालघर येथील कुडे गावाजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार वाहून नेणाऱ्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. ज्या कंटेनरने मागून धडक दिली त्या कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. महामार्गावर आग विझवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने  बराच वेळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार दोन्ही कंटेनर हटवण्याचे काम सुरु असून सध्या महामार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु आहे. कंटेनर हटवल्यानंतर लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल.

First Published on July 21, 2017 10:19 am

Web Title: container accident on mumbai ahmedabad highway one died