News Flash

वाडय़ात दूषित पाणीपुरवठा

७ वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त

७ वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त

वाडा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाजवळील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेली सात वर्षांपासून नादुरुस्त असल्याने वाडय़ातील  नागरिकांना आजतागयत गढून पाणी मिळत आहे.  त्यामुळे येथील नागरिकांना बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

३५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा शहराला वैतरणा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून घेतलेले पाणी थेट वाडा शहरालगत असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आलेल्या १२ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात सोडले जाते. यापूर्वी नदीतून आणलेले पाणी या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरणाच्या टाकीत सोडून ते जलकुंभात सोडले जात होते. मात्र गेल्या सात वर्षांपासून जलशुद्धीकरण नादुरुस्त असल्याने  नागरिकांना गढूळ पाणीपुरवठाच होत  आहे.

गतवर्षी येथील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला या प्रश्नावरुन   धारेवर धरल्यानंतर येथील नगर पंचायत प्रशासनाने सिद्धेश्वर जलाशयातील अतिरिक्त पाणीसाठा येथील कोकाकोला कंपनीला दिल्याने  कंपनीने सीएसआर फंडातून येथील जलशुद्धीकरणाचा प्रश्न सोडविण्याचे निश्चित केले होते. मात्र वर्षभरात  कंपनीला जलशुद्धीकरणाचा प्रकल्प पूर्ण करता न आल्याने या पावसाळ्यात वाडेकरांच्या नशिबी पुन्हा गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ व जलशुद्धीकरणाचा प्रकल्प ज्या जागेवर आहे, ती जागा येथील एका खासगी व्यक्तीच्या मालकीची असून त्याने नगरपंचायतीकडून पर्यायी जागा अथवा शासकीय दराने मोबदला मागितल्याने जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाच्या कामाला अडथळा येत असल्याची माहिती एका नगरसेवकाने  दिली.

कोकाकोला कंपनीच्या सीएसआर फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम लवकरच सुरू  होऊन वाडय़ातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल.

-ऊर्मिला पाटील, सभापती, पाणीपुरवठा समिती, नगर पंचायत वाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:26 am

Web Title: contaminated water supply in wada zws 70
Next Stories
1 अतिजलद रेल्वे प्रकल्पाला विरोध कायम
2 ऐतिहासिक कोहोज किल्ल्याला दगडखाणींचा फटका
3 ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू
Just Now!
X