राज्यात सरकारा स्थापनेसाठी झालेल्या महाविकासआघाडीचे परिणाम आता स्थानिक पातवळीवरील निवडणुकांमध्येही दिसू लागले आहेत. बीड मधील आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने लढाई अगोदरच माघार घेतल्याचे दिसत आहे. कारण, भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात तसं ट्विटच केलं आहे.

“राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी अडीच वर्षांपुर्वीच राष्ट्रवादीला धक्का देत बीड जिल्हापरिषदेवर भाजपाच झेंडा फडकावल होता. मात्र आता बदललेल्या राजकीय परिस्थितीचा येथील निवडणुकीवर झाल्याचे दिसत आहे. येथील भाजपाची सत्ता जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा सत्तेचा मार्ग इथेही सुकर झाल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारस्थापनेत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेत भाजपाच्या उपमहपौरांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेत आपला उपमहापौर देखील बसवला.