05 March 2021

News Flash

घनकचरा प्रकल्पातील धुरामुळे अर्नाळ्यात कोंडमारा

अर्नाळा ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे.

विरार : अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात लागणाऱ्या सततच्या आगीमुळे निघणाऱ्या धुराने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातत्याने उडणाऱ्या धुराच्या लोटामुळे सागरी किनाऱ्यावर प्रदूषण वाढले आहे. यामुळे हा प्रकल्प या ठिकाणाहून हटविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

अर्नाळा ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. ग्रामपंचायत हद्दीतून जमा होणारा कचरा या प्रकल्पात आणला जातो. या कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक वेगळे करून या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मशीनमध्ये त्याचे विघटन केले जाते. मात्र, अन्य कचरा याच ठिकाणी साठवला जात असल्याने त्याचा मोठा ढीग साचलेला आहे.

प्रकल्पाला सातत्याने आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून या कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत. संध्याकाळी ५ नंतर हा प्रकल्प बंद केला जातो. येथे सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेत आग लावण्याचे प्रकार घडतात, परिणामी ही आग दुसऱ्या दिवशीपर्यंत धुमसत राहते आणि सर्वत्र धुराचे लोट पसरतात. या आगीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सागरी किनाऱ्याचे वातावरण मोठय़ा प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी हा प्रकल्प हटविण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 1:45 am

Web Title: continuous fire at the arnala dumping ground endangering the health of citizens zws 70
Next Stories
1 दिवाळीनिमित्ताने फराळाची लगबग
2 डहाणूत जेट्टीसाठी मोबदल्याचा प्रस्ताव
3 जलवाहिनीसाठी महावृक्षांवर कुऱ्हाड
Just Now!
X