News Flash

मराठा आरक्षणावर मंत्र्यांच्या विधानात विसंगती – विखे

मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार एकसुरात बोलत नाही.

मराठा आरक्षणावर मंत्र्यांच्या विधानात विसंगती – विखे

नगर : मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार एकसुरात बोलत नाही. मंत्र्यांची विधाने विसंगती निर्माण करीत असल्याने  मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी केला.

पाथर्डी येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजील प्रतिनिधीशी आ. विखे यांनी संवाद साधून भविष्यात या मागणीसाठी पुढे कसे जाता येईल, याबाबतची मते त्यांनी जाणून घेतली. आ. मोनिका राजळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी आ. विखे यांनी शेवगावमध्येही बैठक घेत मराठा समाजातील प्रतिनिधींची मते जाणून घेतली.

मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील बारकावे सांगत महाविकास आघाडी सरकारने आरक्षण देण्यात कसा घोळ घातला याकडे आ. विखे यांनी लक्ष वेधले. मागासवर्गीय आयोगाकडे आलेल्या हरकतीचे भाषांतर सुध्दा आघाडी सरकार करून देऊ शकले नाही, यावरूनच सरकारची उदासीनता स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेवगाव येथे बोलताना, आरक्षणासंदर्भात मराठा समाज जी भूमिका मांडेल, त्याला पक्षीय भूमिका आड येऊ न देता आपण पाठिंबा देऊ, असेही त्यांनी सांगितले.

आ. मोनिका राजळे म्हणाल्या, मराठा समाजाने यापूर्वी आपल्या मागणीसाठी शांततेने आंदोलने केली. भाजप सरकारने आरक्षण दिल्याने समाजील तरुणांना संधी  मिळाल्या. पण आज मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाल्याने समाजातील तरुणांचे भवितव्य अंधारात गेले आहे. येणाऱ्या काळात समाज जी भूमिका घेईल त्याबरोबर राहू.

नगर व नाशिकची जबाबदारी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावर ज्या संघटना आंदोलनात सहभागी होत्या, त्या संघटनांच्या नगर व नाशिक जिल्ह्यतील प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेण्याची जबाबदारी भाजपने आ. राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार आ. विखे यांनी आज शेवगाव येथून या दौऱ्याला सुरुवात केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणसंदर्भात मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधींची आ. राधाकृष्ण विखे यांनी पाथर्डीत बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. आ. मोनिका राजळे, अरुण मुंडे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 1:51 am

Web Title: contradiction statement minister maratha reservation vk ssh 93
Next Stories
1 हवेतून प्राणवायू निर्मितीचा आयुर्वेद महाविद्यालयात प्रकल्प
2 केंद्र सरकारविरुद्ध जालन्यात काँग्रेसची निदर्शने
3 केंद्र सरकारकडून दोन महिन्यासाठी गहू-तांदूळ मोफत
Just Now!
X