कोव्हीडच्या संकटकाळात आपले शासन क रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत असतानाच उद्योग क्षेत्राकडून याकामी देण्यात आलेले योगदान अनमोल असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले . महाड औद्योगिक क्षेत्रात  महाड उत्पादक संघटनेने उभारलेल्या  दोनशे खाटांच्या कोव्हीड आरोग्य केंद्राचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते  ऑनलाईनद्वारे आज संपन्न झाले . त्यावेळी ठाकरे यांनी ऑनलाईनद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या चार महिन्यांपासून संपुर्ण जगावर ओढवलेल्या क कोरोनाच्या संकटाला सरकार मोठय़ा धैर्याने सामोरे गेले. रुग्णांसाठी राज्यांत दररोज नवीन कोव्हीड केंद्राचे उद् घाटने  राज्यात होत आहेत . कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी आपला महाराष्ट्र एक पाऊल पुढे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ठ केले . महाडमधील उत्पादक संघटनेने सामाजिक बांधिलकीतून उभारलेले हे आरोग्य केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागरुकपणे प्रशासकिय यंत्रणा राबवत जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असल्याचे सांगितले. या आरोग्य केंद्राचा वापर कमीतकमी व्हावा. अशी अपेक्षा खा. तटकरे यांनी व्यक्त करताना या परिसरातील कोरोना रुग्णांना हे आरोग्य केंद्र उपयुक्त ठरेल असे सांगितले . आ भरत गोगावले यांनी हे आरोग्य केंद्र उभारणाऱ्या महाड उत्पादक संघटनेला धन्यवाद दिले. उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव पठारे यांनी  भाषणात या आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी महाड औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखानदारांनी चांगले सहकार्य केल्याचे सांगितले . याठिकाणी दोनशे खाटांची व्यवस्था असून यापैकी शंभर खाटांसाठी देवा ड्रील कारखाना व्यवस्थापनाने अर्थिक हातभार लावला आहे. दोनशे पैकी ८४ बेडसाठी ऑक्सिजन पुरवठय़ाची सुविधाअसून दहा बेडसाठी व्हेंटिलेटर्सची सुविधा असल्याची माहिती पठारे यांनी दिली. हे आरोग्य केंद्र शासनाकडे हस्तांतर केल्यानंतर ऑक्सीजन, औषधे , पी पी ई किट्स आदी आवश्यक त्या आरोग्य सुविधा महाड उत्पादक संघटनेमार्फत पुरवण्यात येणार असल्याचेही संभाजीराव पठारे यांनी सांगितले .

कोकण सिंथेटीक फायबर्स सेंच्यूरी एंका व्यवस्थापनाने या आरोग्य केंद्रासाठी आपल्या तीन रहिवासी इमारती व विश्रामगृह विनामुल्य उपलब्ध करून दिल्याचे पठारे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माणिक जगताप, निधी चौधरी,  विठ्ठल इमानदार, अधिकारी डॉ मोरे ,डॉ भास्कर जगताप, चंद्रसेन पवार आदी उपस्थित होते . सुत्रसंचालन अशोक तलाठी यांनी केले.