26 September 2020

News Flash

वादग्रस्त शालिनी सिनेटोनचा प्रश्न कोल्हापूर महापालिकेच्यासभेत पुन्हा ऐरणीवर

विकसकाने या ठिकाणी सपाटीकरणाचे काम सुरु केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात आली मागणी

शालिनी सिनेटोनच्या जागेवर सपाटीकरण सुरू आहे.

वादग्रस्त शालिनी सिनेटोन येथे झाडे लावण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे. तर ही जागा वारसाहक्क स्थळात (हेरिटेज) समाविष्ट असताना, विकसकाने याठिकाणी सपाटीकरणाचे काम सुरु केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी शुक्रवारी स्थायी समिती सभेत करण्यात आली. प्रशासनाने आज या जागेवर काम सुरु नसल्याचा खुलासा केला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर  शुक्रवारची स्थायी समितीची सभा सभापती संदीप कवाळे यांनी छत्रपती ताराराणी सभागृहात घेत समिती सदस्य यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. वादग्रस्त ठरलेल्या शालिनी सिनेटोनचा प्रश्न सभेत पुन्हा ऐरणीवर आला.

माजी उप महापौर भूपाल शेटे यांनी शालिनी सिनेटोन येथे काम सुरु असल्याचा दावा केला. हा कोल्हापूर शहराच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. ही जागा वारसाहक्क स्थळात असूनही विकसकाने परवाना मंजूर नसताना, सपाटीकरणाचे काम सुरु केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. हे काम तातडीने थांबवावे. झाडे लावणेसाठी उद्यान विभागाने परवानगी दिलेली नाही. सहाय्यक संचालक नगररचना व उपशहर रचनाकार यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उप शहर रचनाकार एन.एस.पाटील यांनी आज जागेवर काम सुरु नाही. तेथे वृक्षारोपण केले जात असल्याचे सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी याठिकाणी झाडे लावण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 8:45 pm

Web Title: controversial shalini cinetones question again on kolhapur municipal corporation meeting msr 87
Next Stories
1 महाबळेश्वर : किल्ले प्रतापगड परिसरात आढळला १२ फुटी अजस्र अजगर
2 गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदाराच्या वाहनातून एक कोटीची रोकड जप्त
3 महाराष्ट्रात ३४९३ नवे करोनाबाधित, १२७ मृत्यू, संख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा
Just Now!
X