10 August 2020

News Flash

शहापुरात तीन पोलिसांना मारहाण

तिघेजण बसून बाइक चालविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणाऱ्या शहापूरच्या तीन पोलिसांनाच मारहाण केल्याने पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

| April 10, 2015 06:04 am

तिघेजण बसून बाइक चालविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणाऱ्या शहापूरच्या तीन पोलिसांनाच मारहाण केल्याने पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. गुरुवारी दुपारी किन्हवली फाटय़ावर ही घटना घडली.
  किन्हवली फाटय़ाजवळ मनोज नारायण लकडे हा ‘ट्रिपल सीट’ बाइक चालवत असताना नाक्यावर असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर देवकर, पोलीस नाईक प्रशांत वाघ व पोलीस शिपाई दीपक जाधव यांनी बाइक थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत असताना मनोजने  त्याच्या अन्य साथीदारांना बोलावले. पजेरो गाडीतून आलेल्या मनोजच्या साथीदारांनी लोखंडी रॉड, गुप्तीने देवकर, वाघ व जाधव या तिघांना बेदम मारहाण केली. याबाबत मनोज लकडे याच्यासह जयेश लकडे, सुनील लकडे, अनिल कांबळे, प्रीत व अन्य दोन जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, संगनमताने मारहाण करणे असा गुन्हा शहापूर पोलिसांत दाखल केला आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. शिंदे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 6:04 am

Web Title: cops beaten up in shahapur
Next Stories
1 पेट्रोल पंपचालकांचे उद्या ‘खरेदी बंद’ आंदोलन
2 मोहिते-पाटील समर्थकांवर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा खुनीहल्ला
3 खर्चाला राज्याची मंजुरी घ्यावी लागणार!
Just Now!
X