रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या सातत्याने वाढती असून शुक्रवारी एकाच दिवसात करोनामुक्तांचे उच्चांकी त्रिशतक (३७४) नोंदले गेले आहे.

गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने ११६ करोनिबाधित आढळून आले. पण या संख्येच्या तिपटीपेक्षा जास्त रूग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८०.७९ टक्के झाले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सुरु झालेल्या घरोघरी तपासणीमुळे बाधितांचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान सुमारे आठवडाभराच्या खंडानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाबाधितांनी शंभरी ओलांडली आहे.

त्यापैकी ५० टक्के रूग्ण चिपळूण आणि रत्नागिरी याच दोन तालुक्यांमधील आहेत. तसेच गुरुवारी फक्त एका ६६ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू ओढवला असून गेल्या ११—१२ सप्टेंबर रोजी मरण पावलेल्या २ रूग्णांची उशीरा नोंद झाली आहे.