सध्याच्या करोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी हे करोनाविरोधात लढणारे पहिल्या फळीतील योद्धे आहेत. करोनापासून बचावासाठी त्यांना सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. रायगड जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना या आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा राखली होती. मात्र, आता करोनानं त्यांना गाठल आहे. जिल्ह्यात दोन वॉर्डबॉयना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा- करोनामुळे एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद
महाड आणि कर्जत येथील नर्स तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांना यापूर्वीच करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता या दोन वॉर्डबॉयना लागण झाल्याचं समोर आलं आहे. या दोघांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आरोग्य सेवेतील सहा जणांना करोनाची बाधा झाल्याची नोंद झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 12:37 pm