28 February 2021

News Flash

सलून चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण; वर्ध्यात खळबळ

आर्वी शहरात अकोल्याहून माहेरी आलेली महिला करोनाबाधित

सावंगी येथील करोनाबाधित महिलेच्या घरातील एक १९ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह तर इतर तीन व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. या महिलेला सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिलेचं केशकर्तनालयाचं दुकान आहे.

करोना पॉझिटिव्ह निघालेली महिला ही रुग्ण महिलेची नणंद आहे. ती आपल्या भावासह सावंगी परिसरात सलून चालवीत असल्याची माहिती मिळते. या सलूनमध्ये सावंगीच्या रुग्णालयातील डॉक्टर कटिंग करण्यास येत असल्याने तर्कवितर्कांना सध्या शहरात उधाण आले आहे.

आर्वी शहरात अकोल्याहून माहेरी आलेली महिला करोनाबाधित

दरम्यान, आर्वी शहरात अकोल्याहून माहेरी आलेली २४ वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. ही महिला आपल्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन २४ मे रोजी अकोला येथून आर्वी येथे आली होती. तिला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तिच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल आज प्राप्त झाला, यामध्ये ती करोनाबाधित असल्याचे पुढे आले. त्यामुळे वर्ध्यातील एकूण रुग्ण संख्या आता १८ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 10:04 am

Web Title: corona infected woman found who is running salon sensation create in wardha aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 … म्हणून राज्यात भाजपाकडून इतर मार्गांचा वापर : पृथ्वीराज चव्हाण
2 करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण
3 राहुल गांधीच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
Just Now!
X