15 July 2020

News Flash

धुळ्यात पोलिसाला करोनाची लागण

नव्याने चार रुग्ण

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ातील गुरुवारी नव्याने चार रुग्णांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले. यातील धुळे तालुक्यातील विंचूर गावातील एका करोनाग्रस्त मुलीचा मृत्यू झाला आहे. अन्य तिघांमधील एक पोलीस कर्मचारी असून एक ग्रामीण डाकसेवक आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२४ झाली असून मृत रुग्णांची संख्या १६ झाली आहे. तर ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

धुळे शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दरदिवशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात ६३ संशयितांची चाचणी झाली. त्याचे अहवाल गुरुवारी आले. त्यामध्ये चार रुग्णांचे अहवाल सकरात्मक आले. जुने धुळे भागातील गुरुदत्त कॉलनीमधील ५९ वर्षांचा ग्रामीण डाकसेवक, देवपूरातील ग. द.माळी सोसायटीमधील ४२ वर्षांचा पोलीस, शिवाजी नगर भागातील ५२ वर्षांचा पुरुष आणि धुळे तालुक्यातील विंचूर येथील १५ वर्षांची मुलगी यांचा यात समावेश आहे. सदरच्या मुलीने आत्महत्या केली होती. खबरदारी म्हणून डॉक्टरांनी तिचेही नमुने चाचणीसाठी पाठविले होते. तिचाही अहवाल सकारात्मक आला.

दोन महिन्यांपासून एकाही पोलिसाला करोनाची लागण झालेली नव्हती. सर्वच अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रात्रंदिवस करोना युध्दात आपले योगदान देत आहेत. यापूर्वी एसआरपीच्या सात जवानांना करोनाची लागण झाली होती. परंतु, पोलीस विभागात करोनाचा शिरकाव झाला नव्हता. दोन दिवसांपूर्वी देवपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह ३० पोलिसांची चाचणी झाली. यात एका ४२ वर्षांच्या पोलिसाला करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. यामुळे पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 3:17 am

Web Title: corona infection to police in dhule abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नंदुरबार जिल्हा परिषद सभेत सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध भाजपसह सेना आक्रमक
2 शाळा दुरूस्ती करुन चाकरमान्यांचे विलगीकरण सत्कारणी
3 सांगलीच्या सराफ बाजारामध्ये हालचाल
Just Now!
X