मुंबई ,पुणे वा अन्य भागातून गणेश उत्सवासाठी येणारे चाकरमानी खारेपाटण येथे आल्यावर जिल्हा प्रवेशद्वारासमोरच चेक पोस्ट तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्ट तपासणी व लॅब होणार आहे. या जागेची पाहणी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केली.

या तपासणीमुळे चाकरमानी गणपती करता करोना घेऊन आले, ही भीती स्थानिकांच्या मनात राहणार नाही, असे प्रांताधिकारी राजमाने यांनी म्हटले आहे.

जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण याठिकाणी चाकरमान्यांच्या  वाहनांच्या रांगा वाढल्या असून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे आणि ते चाकरमानी सुरक्षित रहाण्याकरता कोविड तपासणी यंत्रणा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात येत आहे.

रॅपिड टेस्टमुळे रुग्ण आढळल्यास लगेच अहवाल येणार आहे. तसेच गावचा विलगिकरण कक्ष किंवा कोविड सेंटर प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गतिमान होणार आहे. तसेच विलगिकरण कक्षात  अथवा  तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जाणार आहे .प्रत्येक व्यक्तीची व वाहनांची सुरक्षेची  खबरदारी घेतली जाणार आहे.

खारेपाटण चेकपोस्ट नाक्यावर कडक तपासणी रॅपिड टेस्ट ,लॅब,नोंदणी कक्ष एकाच परिसरात होत आहे. एखाद्य रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीला करोना संसर्ग असेल तर त्याला प्रवेशद्वारापाशी रोखले जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे चाकरमानी गावी आल्यावर करोना घेऊन आले. ही भीती त्यांच्या मनात राहणार नाही.