06 August 2020

News Flash

कर्जतच्या भूमिपुत्राकडून ‘करोना किलर’ यंत्राची निर्मिती

विशेष म्हणजे या उपकरणाचा वापर करताना साबण किवा सॅनिटायझर हे लागत नाही.

गणेश जेवरे, लोकसत्ता

कर्जत :  कर्जत तालुक्यातील पिंपळवाडीचे भाऊसाहेब जंजिरे यांनी त्यांच्या पुणे येथील इंडो टेक इंडस्ट्रियल सोल्युशन या कंपनीमध्ये संशोधन करू न ‘करोना किलर’ या इलेक्ट्रिक उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण  फक्त विजेवर चालते. विशेष म्हणजे या उपकरणाचा वापर करताना साबण किवा सॅनिटायझर हे लागत नाही. या उपकरणाच्या कार्यक्षमतेला पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, भारतीय वैद्यक संशोधन परिषद, नायडू रुग्णालय यांनी मान्यता दिली आहे.

या उपकरणाचा वापर घर, शाळा, रुग्णालये, गाडय़ा, विमाने, प्रयोगशाळा, विलगीकरण केंद्रे , कारखाने, मंदिरे अशा सर्व ठिकाणी करता येऊ शकतो पुण्यातील नायडू हॉस्पिटल मध्ये या उपकरणाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे

एवढेच नव्हे तर कोविड रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट यासह इतर वस्तूंचे  निर्जंतुकीकरण करण्यास या उपकरणाची मदत होते.

अशी २०० उपकरणे रोज या कंपनीमधून तयार करण्यात येत असून प्रतिदिवस सातशे उपकरणे तयार करण्याची क्षमता या कंपनीची आहे. सर्व उपकरणे देशात व देशाबाहेर पाठवण्यात येत आहेत, अशी माहिती या उपकरणाची निर्मिती करणारे भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली. त्यांच्या या संशोधनाबद्दल उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:13 am

Web Title: corona killer device manufacturer from local boy of karjat zws 70
Next Stories
1 सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत दहा दिवस संपूर्ण टाळेबंदी
2 वसईच्या देवकुंडी नदीत अडकलेल्या ७ पर्यटकांची सुटका
3 संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस निलंबित, दोन उपनिरीक्षकांच्या बदल्या
Just Now!
X