जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज सोमवारी दिवसभरात रूग्णांची या महिन्यातील उच्चांकी संख्या वाढली. नव्याने तब्बल १५९ रूग्ण आढळल्याने प्रशासनासमोरील आव्हानही वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची रूग्णांची संख्या एक हजार आठशेच्या घरात पोहचली आहे. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४६ वर पोहचला आहे.

आज मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद शहरातील लक्ष्मीनगर येथील ६२ वर्षीय पुरूष व ग्रीन पार्क येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये पांढरकवडा शहरातील १२ पुरुष व १६ महिला, पांढरकवडा ग्रामीण भागातील पाच पुरूष व चार महिला, उमरखेड शहरातील २४ पुरुष व १४ महिला, उमरखेड ढाणकी भागातील चार पुरूष व दोन महिला, नेर शहरातील पाच पुरुष व चार महिला, नेरजवळील घारफळ येथील एक पुरूष, महागाव शहरातील सात पुरुष व सात महिला, महागाव ग्रामीणमध्ये शेनड येथे सहा पुरुष व दोन महिला, बेलदरी येथील दोन पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील १२ पुरुष व १३ महिला असून त्यात दलित सोसायटी येथील एक पुरूष व एक महिला, शास्त्रीनगर येथील एक पुरूष, मातोश्रीनगर येथील दोन पुरूष व दोन महिला, नवप्रभात चौक माळीपुरा येथील दोन पुरूष व दोन महिला, गोधणी रोड येथील तीन महिला, गोदाम फैल येथील एक पुरूष व दोन महिला, लक्ष्मी नगर येथील एक पुरूष, पाटीपुरा येथील दोन पुरूष व एक महिला यांचा समावेश आहे.

यवतमाळ ग्रामीणमध्ये बोरगाव येथील एक पुरूष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील एक पुरूष, शिवाजी चौक येथील दोन महिला, गणेश वार्ड येथील एक पुरूष, उदासी वार्ड येथील एक पुरूष व एक महिला, मोती नगर येथील एक पुरूष, गवळी लेआऊट येथील एक महिला, आर्णी शहरातील राणाप्रतापनगर येथील एक महिला, दिग्रस शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील एक पुरूष, दारव्हा शहरातील आठवडी बाजार येथील एक पुरूषाचा समावेष आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४९५ इतकी आहे. एकूण १ हजार ७५८ रूग्णांपैकी आतापर्यंत १ हजार २१७ रूण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या विलगीकरण कक्षात १३८ संशयित दाखल आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ २७ हजार ७८९ संशयितांची तपासणी झाली आहे.