रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्येने आता सात हजारांच्या टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात २४ तासात  करोनाचे ३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७ हजार ३३२ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील सध्या ३ हजार ९ जणांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात २१४ जण करोनामुक्त झाल्याने, आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची संख्या ४ हजार ११८ वर पोहचली आहे.  १२२ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर करोनामुळे जिल्ह्यात दगावणाऱ्यांची संख्या आता २०५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या ३८४ करोनाबाधितांमध्ये,  पनवेल मनपा हद्दीतील १६९, पनवेल ग्रामिण मधील ५४, उरण मधील ३०, खालापूर २८, कर्जत १५, पेण ३८, अलिबाग १८, मुरुड १२,  तळा १, रोहा ६, श्रीवर्धन १, म्हसळा ०, महाड २ पोलादपूर १० रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा २, कर्जत १, अलिबाग १, मुरुड १ येथे एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २१४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २५ हजार ८१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ९ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १३६४, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४०९ उरण मधील १७६,  खालापूर २२५, कर्जत ९४, पेण २४२, अलिबाग १८१,  मुरुड ४८, माणगाव ५४, तळा येथील ४, रोहा ७५, सुधागड ०, श्रीवर्धन ४१, म्हसळा ४४, महाड ३९, पोलादपूर मधील १३ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५६ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण या शहरीतालुक्यात रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहेच. अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या पण दिवसागणिक वाढते आहे. चिंताजनकबाब म्हणजे या तालुक्यांमध्ये शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.