News Flash

करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा- अजित पवार

जे नियम पाळणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा काळ कदाचित वाढूही शकतो असेही संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. लोकांनी गर्दी केली नाही, बेजबाबदारपणे वागणं सोडलं नाही तर लॉकडाउन वाढूही शकतो. याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Lockdown: अत्यावश्यक सेवेसाठीच्या पासचा गैरवापर; जप्तीचे पोलिसांना आदेश

सर्वांनी लॉकडाउनचे, संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन अजित पवार यांनी पुन्हा एकदा केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आवाहन केलं आहे. जीवनावश्यक वस्तू घ्यायला जाताना लोकांनी गर्दी करु नये. मेडिकलमध्येही गर्दी करु नये असंही आवाहन अजित पवार यांनी स्पष्ट केलं. NGO, देवस्थानं, कंपन्या यांच्याकडून सरकारला चांगली मदत केली जाते आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जो कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच सरकारी यंत्रणांना कुणीही करु नये, उर्मटपणाची भाषा, उद्धटपणा हे सहन केलं जाणार नाही. सुरक्षित बसा आणि घरात थांबा असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- मुंबईत रुग्णांची संख्या १६२ वर, पाच हजारांपेक्षा अधिक जण ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे

सध्या महाराष्ट्रावर आणि देशावर जे संकट आलं आहे त्या संकटात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कुणीही कसलंही राजकारण करु नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशीही भेट झाली होती. जगावरच्या संकटातून आपली सुटका होण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असं शरद पवारांनी सांगितल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 3:39 pm

Web Title: corona patients increasing is the dangerous alaram says deputy cm ajit pawar scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown: अत्यावश्यक सेवेसाठीच्या पासचा गैरवापर; जप्तीचे पोलिसांना आदेश
2 मुंबईत रुग्णांची संख्या १६२ वर, पाच हजारांपेक्षा अधिक जण ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे
3 CoronaVirus : बीड जिल्ह्यासाठी ११ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता
Just Now!
X