19 September 2020

News Flash

करोना संशयिताची विलगीकरण कक्षात आत्महत्या

करोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच आत्महत्या

संग्रहित छायाचित्र

पाचोरा येथील साईमोक्ष विलगिकरण कक्षात  करोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मंगळवारी मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील विनोद कोकणे (३३) या युवकाने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

हा युवक रविवारी रात्री विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. सोमवारी त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

घटनास्थळी मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, डॉ.अमित साळुंखे यांनी भेट दिली. या युवकावर शासकीय नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाने आत्महत्या का केली, याचे निश्चित कारण उघड झालेले नाही. विनोद हा शेतीकाम करणारा घरातील कर्ता होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, पाच वर्षांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:16 am

Web Title: corona suspect commits suicide in isolation room abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 भुसावळात वीज ग्राहकांच्या देयकांमध्ये महावितरणकडून दुरूस्ती
2 राज्यात समूह संसर्ग नाही : आरोग्यमंत्री
3 उपचार केंद्रांतील गैरसोयी आठवडय़ाभरात दूर करणार
Just Now!
X