News Flash

Corona Update : २४ तासांत राज्यात १४ हजार ३१७ नवे करोनाबाधित; ५७ मृत्यू!

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १४ हजार ३१७ नवे करोनाबाधित सापडले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

गुरुवारी दिवसभर राज्यात MPSC पूर्व परीक्षा आणि त्यासाठी परीक्षार्थींचं सुरू असलेलं आंदोलन याचीच चर्चा होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण सांगत आयोगानं परीक्षा पुढे ढकलली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरू आंदोलन केल्यानंतर परीक्षा पुढच्या आठ दिवसांत घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातल्या दिवसभरातल्या करोना आकडेवारीमुळे करोनाचं उग्र रुप समोर आलं आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात तब्बल १४ हजार ३१७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. तसेच, ५७ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे.

गेल्या २४ तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ९२.९४ टक्के इतका आहे. पण दुसरीकडे सातत्याने वाढणारी बाधितांची संख्या चिंतेत भर टाकू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, गुरुवारच्या ५७ मृत्यूंसोबत आता राज्यातल्या मृतांचा आकडा देखील वाढून ५२ हजार ६६७ इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर २.३२ टक्के इतका आहे.

मुंबईतल्या आकडेवारीचा विचार करता आज दिवसभरात मुंबईत १ हजार ५०९ नवे करोनाबाधित सापडले असून एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ३८ हजार ६४३ च्या घरात गेला आहे. तर दिवसभरात झालेल्या ४ मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ११ हजार ५१९ वर गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 9:23 pm

Web Title: corona update covid patients in maharashtra todays death count pmw 88
Next Stories
1 Breaking : MPSC पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!
2 MPSC : “अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर वडेट्टीवारांची नाराजी!
3 “अशामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण”, देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा!
Just Now!
X