News Flash

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात ५२,८९८ रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर!

महाराष्ट्राच्या करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यांच्या वर गेला आहे!

संग्रहीत छायाचित्र

गेल्या महिन्यात १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अजूनही राज्यात हा लॉकडाऊन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या करोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहे!

 

मृत्यूंची संख्या अजूनही नियंत्रणात येईना!

दरम्यान, एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. आरोग्यविभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के!

दरम्यान, आज राज्यात सापडलेल्या नव्या २८ हजार ४३८ करोनाबाधितांमुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता ५४ लाख ३३ हजार ५०६ इतका झाला आहे. त्यापैकी ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ करोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के नोंदवण्यात आला आहे.

Kalyan Dombivali Corona Cases – २४ तासांत ५२८ रुग्णांना डिस्चार्ज, १८ रुग्णांचा मृत्यू!

पुण्यात एकाच दिवसात १ हजार ०२१ नवे करोनाबाधित!

दुसरीकडे पुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 8:35 pm

Web Title: corona updates in maharashtra records 679 deaths covid 19 situation pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू
2 “आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देऊ नका”, मराठा मोर्चा समन्वयकांनी भाजपाला सुनावलं!
3 शरद पवारांबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं केंद्राला पत्र; म्हणाले…
Just Now!
X