News Flash

लसीकरणासाठी ज्येष्ठांची १५ किलोमीटर पायपीट

विक्रमगड तालुक्यात ५ मार्चपासून आठवडय़ाच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी असे दोन दिवस ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यांत येणार आहे.

विक्रमगड शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंर्झे, मलवाडा व तलवाडा या तीन ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रावर लसीकरण होणार आहे.

विक्रमगड तालुक्यात आजपासून लसीकरणास सुरुवात

लोकसत्ता, वार्ताहर

वाडा :  विक्रमगड तालुक्यात ५ मार्चपासून आठवडय़ाच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी असे दोन दिवस ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यांत येणार आहे. मात्र या लसीकरणाचे केंद्र विक्रमगड शहरात न ठेवता ते शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे. यामुळे  ज्येष्ठ नागरिकांचे हाल होणार आहेत.

विक्रमगड येथे ग्रामीण रुग्णालय असताना देखील या रुग्णालय आहे. तेथे लसीकरणाची सुविधा देणे शक्य असतानाही   विक्रमगड पासुन १२ ते १५ किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या कुंझ्रे, मलवाडा व तलवाडा या तीन ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ते त्रासाचे ठरणार आहे.

येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विक्रमगड शहरातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी  मुलीधर मेहेर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.   दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी  येत्या काही दिवसांत विक्रमगड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे. लसीसंदर्भात आशा सेविकांकडून गाव-खेडोपाडी  माहिती दिली जात आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये डॉक्टर, आरोग्यसेविका, कर्मचारी व आशासेविका अशा पाच जणांचे पथक हे काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:02 am

Web Title: corona vaccination elder people walk 15 kilometers dd 70
Next Stories
1 डोंगर-टेकडय़ांना पुन्हा हिरवा साज
2 सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय
3 उपसरपंच निवडीदरम्यान सांगलीत हाणामारी
Just Now!
X