News Flash

दुसऱ्या लाटेचा पोलीस दलावर परिणाम नाही

करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्यांच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या राज्य पोलीस दलात संसर्ग वेगाने पसरला.

मुंबई : लसीकरणामुळे राज्यात दुसरी लाट उसळली असली तरी पोलिसांमधील बाधितांचे प्रमाण तुलनेने कमी असून करोना प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रेनंतर पोलीस दलातील संसर्गाचा प्रादुर्भाव थोपवणे शक्य होईल, असा विश्वास मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही गाफील न राहता पूर्वीप्रमाणेच आवश्यक काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याची सूचना आयुक्तालयाने पोलिसांना दिली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्यांच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या राज्य पोलीस दलात संसर्ग वेगाने पसरला. पहिल्या लाटेत जमावबंदी, संचारबंदी, टाळेबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र हळूहळू पोलिसांवरील जबाबदारी वाढली. विलगीकरण केंद्रांची सुरक्षा, विलगीकरणातील रुग्ण पसार होऊ नयेत, पसार झालेल्यांच्या शोधासह, परप्रांतीय मजुरांची पाठवणी राज्य पोलीस दलाच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. सध्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी वर जमावबंदीच्या अंमलबजावणीसह इतर वेळेत गर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई आणि प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र यंदा बहुतांश पोलिसांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.सध्या अतिदक्षता विभागात किंवा व्हेंटिलेटरवर एकही बाधित पोलीस नाही. गेल्या वर्षी हजारो बाधित..

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत ३० हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाले. तर साधारण ३०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. बाधितांमध्ये ४५ वर्षांवरील पोलीस अधिक होते.

पोलीस दलावर दुसऱ्या लाटेचा परिणाम तूर्तास जाणवलेला नाही, मात्र आवश्यक काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. – यशवंत व्हटकर, सहआयुक्त, प्रशासन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:07 am

Web Title: corona virus infection corona second wave police worker akp 94
Next Stories
1 राज्यात काजू बोर्ड निर्माण करून काजूबीला हमीभाव देण्याची मागणी
2 कर्नाळा अभयारण्यालगत महामार्गाला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५७ हजार ७४ करोनाबाधित वाढले, २२२ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X