साताऱ्यातील करोना परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह दाखल झाले. अजित पवार दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. इतकंच नाही, तर काही जण पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी हजर झाले. पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना बघून अजित पवारांनी नाराजीचा सूर लावला. तसंच कार्यकर्त्यांचे कानही टोचालया ते विसरले नाही.

महाराष्ट्रात साताऱ्यात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. सर्वाधिक रुग्ण इथे सापडत आहेत. तरीही तुम्ही इथे गर्दी करताय, बुके घेऊन येताय. सातारा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करतो, आमच्यावर प्रेम करतो याबद्दल दुमत नाही. पण नियम पाळा असं सारखं सांगायचं का आता ,आता तुमचे बुके, सत्कार स्विकारले नाही की तुम्ही बोलणार अजित पवार बुके घेत नाही, घेतला तरीही प्रॉब्लेम. लांब रहा…नियम पाळा”, अशा शब्दांमध्ये सांगत त्यांनी सर्वांनाचं चांगलं सुनावलं. सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहाजवळ काही कार्यकर्ते अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी हजर होते. याठीकाणी झालेली गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पाहून अजित पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना फैलावर घेतलं.

यावेळी सायंकाळी सात ते रात्री दहाच्या बैठकीदरम्यान अजित पवारांनी साताऱ्यातील करोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला. रुग्णसंख्येत सातारा जिल्हा सहाव्या स्थानावर असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवारांना साताऱ्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानंतर अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज साताऱ्यात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तुमचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे पवार साहेबांच्यावर प्रेम आहे, असू द्या पण करोना आहे हे पण लक्षात ठेवा. बुके वगैरे बाजूला ठेवा, असं सांगत

अजित पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारला आहे. परंतू त्यांनी कोरोनाचे काहीतरी नियम पाळा, मग म्हणाल अजित दादा पुष्पगुच्छ स्वीकारत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच दोन-तीन कार्यकर्त्यांकडून त्यांनी बुके स्वीकारताना त्यांना लांब राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार आणि टोपे हे साताऱ्यात संध्याकाळी दाखल झाले.