जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
सातारा जिल्हयात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज पासून ३० एप्रिल पर्यंत सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध जाहीर केले आहेत. करोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली किंवा ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. राज्य शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवा (रुग्णालय, औषध दुकाने व आरोग्य सेवेशी संबंधित सर्व सुविधा, किराणामाल, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थाची दुकाने, कृषी सेवा) सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा मॉल पूर्णपणे बंद ठेवावी लागतील.
खालील गोष्टींचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असेल –
रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने. सार्वजनिक परिवहन – ट्रेन, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस. विविध देशांच्या मुत्सद्दारांच्या कार्यालयाशी संबंधित सेवा. स्थानिक प्राधिकरणांकडून किंवा शासनाकडून मानसूनपूर्व कार्यवाही. स्थानिक प्राधिकरणाव्दारे देणेत येणा-या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक. कृषी संबंधित सेवा. ई- कॉमर्स. अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा सुरु राहतील. सर्व दुकाने मॉल्स बियर बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिखर सिंग यांनी दिले आहेत.सिनेमा हॉल बंद राहतील. नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील. मंनोरंजन पार्क, आर्केडस्र , व्हिडीओ गेम्स पार्लरस बंद राहतील. वॉटर पार्क बंद राहतील. क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले बंद,कापड,सोने चांदी, हार्डवेअर,विद्युत उपकरणे आदी दुकाने बंद राहतील. सर्व धर्मिय धार्मिक, प्रार्थना स्थळे बंद राहतील. सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतू यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही .राज्य शासनाने “ब्रेक द चेन’ हा उद्देश ठेवत निर्बंध लागू केले. त्यामध्ये शुक्रवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी आठ या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत; परंतु त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये सर्व दुकाने सुरू राहणार नाहीत हे शासकीय आदेशावरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायला सोमवार ते शुक्रवारीपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात, तसेच शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत अत्यावश्‍यक कारणाशिवाय पूर्णत: बंदी असणार आहे.प्रवासादरम्यान प्रत्येकाला मास्क आवश्‍यक आहे. प्रत्येक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाचे करोना लसीकरण झालेले पाहिजे किंवा करोना झालेला नसल्याबाबतचा 15 दिवसांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट त्याच्यासोबत आवश्‍यक आहे. रिक्षा किंवा टॅक्‍सीमध्ये चालकाने प्लॅस्टिक शिट लावून स्वत:ला प्रवाशांपासून वेगळे करून घेतले तर, त्यांना रिपोर्ट जवळ बाळगण्याची गरज असणार नाही.सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना सुट असेल. परिक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 15 दिवसापर्यंत वैध असलेले कोरोनाचे झालेला नसल्याबाबतचे आरटीपीसीआर प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील असा आदेश सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केला आहे.