जगभरात विविध कंपन्या करोनाची लस शोधथ आहेत. कोणती लस बाजारात आधी येणार? यासंबंधीही प्रश्न विचारले जात आहेत. तर दुसरीकडे करोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वात आधी करोना लस देण्यात येणाऱ्या करोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं आणि कुटुबीयांची नावं समाविष्ट करण्यासाठी राजकारणी व काही अधिकारी दबाव टाकत आहेत अशी माहिती जिल्हा व नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या निकषांनुसार राजकारणी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या कक्षेत येत नाहीत. मात्र आम्ही दररोज सामान्य लोकांना भेटतो त्यामुळे आम्ही देखी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये येतो. सोबतच कुटुंबातील सदस्यांचाही समावेश केला जावा अशी माहिती मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याने दिली. पुणे आणि नागपुरातही अशाच मागण्या केल्या जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.