चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ९४४ वर पोहोचली आहे. यांपैकी करोनातून ५६१ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ३७५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल ८९८ बाधितांची संख्या होती. आज सायंकाळपर्यंत ९४४ वर पोहोचली. दरम्यान, घुग्घुस येथील ६८ वर्षीय महिला बाधितेचा काल मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे.

आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहरातील पोलीस लाईन परिसरातील एक, हनुमान मंदिर जवळील एक, लालपेठ कॉलरी परिसरातील एक, सुभाष नगर डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील दोन, विवेकानंद वार्ड येथील चार, न्यू कॉलनी परिसरातील एक, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील एक, वृंदावन परिसरातील एक, रामनगर येथील दोन, गुरुद्वारा परिसरातील एक, रीद्धी अपार्टमेंट परिसरातील एक असे चंद्रपूर शहरातील १६ बाधितांचा समावेश आहे.

लक्कडकोट तालुका राजुरा, जम्मुकांता तेलंगणा, गोंडपिपरी, भद्रावती येथील प्रत्येकी एका बाधितांचा समावेश आहे. गोकुळ नगर वार्ड बल्लारपूर येथील दोन, हिरापूर तालुका सावली येथील तीन बाधितांचा समावेश आहे. वरोरा मालवीय वार्ड एक व कर्मवीर वार्ड एक असे एकूण दोन बाधित पुढे आलेले आहेत. ब्रह्मपुरी रेल्वे कॉर्टर एक, सुंदर नगर दोन, तीलक नगर एक व मांगली येथील दोन असे एकूण सहा बाधितांचा समावेश आहे. मिंथुर तालुका नागभीड येथील एक, मोहाडी येथील दोन, पळसगांव येथील तीन, पार्डी ठावरी येथील एक, मसाळी येथील एक, कोडेपार येथील एक, कन्हाळगांव येथील एक, नागभीड शहरातील तीन बाधित असे नागभिड येथील १३ बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १५ हजार ७७५ नागरिकांची अँन्टिजन तपासणी केलेली आहे. यांपैकी १६९ पॉझिटिव्ह असून १५ हजार ६०६ निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ हजार २२२ नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये ९९८ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. १ हजार ३८४ नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

जिल्ह्यातील ७६ कंटेन्मेंट झोन

जिल्ह्यात सध्या ७६ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. ४०१ आरोग्य पथकांद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यांमधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या ६९ हजार १७९ आहे.