महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली असून हा टप्पा गाठणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात करोनाबाधांची संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. शुक्रवारी राज्यात १८ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातले होते.

दरम्यान दुसरीकडे देशात करोनाची रुग्णवाढ मंदावली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. टाळेबंदीपूर्वी दर तीन दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत होती. गेल्या सात दिवसांमधील आकडेवारीनुसार हे प्रमाण आता ६.२ दिवसांवर आले असल्याचं सांगण्यात आलं आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १९ राज्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. त्यात महाराष्ट्राचा मात्र समावेश नाही. मात्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे या सर्व राज्यांमध्येही करोनाचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. ताप आलेल्या व्यक्ती तसेच, फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्या व्यक्तींच्या नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशभरात शुक्रवारी १००७ नवे रुग्ण आढळले असून करोनाबाधितांची एकूण संख्या १३८३५ झाली आहे.

Live Blog

22:09 (IST)18 Apr 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी आढळले ७ जण करोना पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती आणखी  चिंताजनक होत आहे. कारण, आज एकूण सात जण करोनाची लागण झाली आहे. आलेल्या अहवालात ते करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ४ पुरुष आणि ३ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांची संख्या वाढली असून तो ५८ वर पोहचला आहे. यातील १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  दोघांना आज घरी सोडण्यात आले.

22:05 (IST)18 Apr 2020
मालेगावात करोनाचे १० नवे रुग्ण

मालेगावात करोनाचे आणखी १० लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ५ आणि आता १० अशा १५ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मालेगावमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता ७७ झाली आहे.

21:54 (IST)18 Apr 2020
शेजारील देशांच्या परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल; केंद्राची परवानगी आवश्यक

करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकानं आपल्या परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल केला आहे. भारताच्या शेजारील देशांना आता भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारताला ज्या देशांच्या सीमा लागून आहेत अशा देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच गुंतवणूक करू शकेल असं 'उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळा'कडून (डीपीआयआयटी) सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत.

21:03 (IST)18 Apr 2020
पिंपरी चिंचवडमध्ये ७ नवे करोनाग्रस्त

पिंपरी-चिंचवडमध्ये आज एकूण ७ जण नवे करोनाबाधित आढळले आहेत. यात ४ पुरुष आणि ३ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढला असून तो आता ५८ वर पोहचला आहे. यातील १५ जणांना करोनामुक्त करण्यात आल असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

20:50 (IST)18 Apr 2020
बाधित क्षेत्राबाहेरील रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ

शुक्रवारी प्राप्त झालेल्या येथील चौदा करोनाबाधित रुग्णांपैकी दोघे रुग्ण हे बाधित क्षेत्राबाहेरील असल्याचे आढळून आल्याने करोनाविरुध्द लढा देणाऱ्या प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दरम्यान येथील जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोना संशयिताचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे.

20:19 (IST)18 Apr 2020
राज्यात ३२८ नवे करोनाग्रस्त, महाराष्ट्राची रुग्णसंख्या ३६०० च्याही पुढे

महाराष्ट्रात ३२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३६४८ इतकी झाली आहे. ३२८ पैकी सर्वाधिक म्हणजे १८४ रुग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज मुंबईत सर्वाधिक १८४ रुग्ण आढळल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

20:19 (IST)18 Apr 2020
राज्यात ३२८ नवे करोनाग्रस्त, महाराष्ट्राची रुग्णसंख्या ३६०० च्याही पुढे

महाराष्ट्रात ३२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३६४८ इतकी झाली आहे. ३२८ पैकी सर्वाधिक म्हणजे १८४ रुग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज मुंबईत सर्वाधिक १८४ रुग्ण आढळल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

20:05 (IST)18 Apr 2020
नाशकात रुग्णांच्या संख्येत वाढ

शनिवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नाशिक शहरात नव्याने चार तर मालेगावमध्ये पाच असे एकूण नऊ करोनाबाधित रूग्ण आढळून आले. मालेगाव येथे सकाळी एका संशयित रूग्णाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७९ झाली आहे.

नाशिक शहर -  ९
मालेगाव - ६७
उर्वरित भागातील - ३
एकूण - ७९

19:50 (IST)18 Apr 2020
वसई-विरारमध्ये १५ नवे करोनाचे रुग्ण; ४ दिवसांच्या बाळालाही करोना

शनिवारी वसई विरारमध्ये करोनाचे नवे १५ रुग्ण सापडले. त्यानंतर वसई विरारमधील करोनाग्रस्तांची संख्या ही ८३ वर पोहोचली आहे. पालिकेच्या सर डीएम पेटीट आणि नायगावच्या माता बालसंगोपपन केंद्रातील १२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नालासोपाऱ्यात ४ दिवसांच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून वसईत एका महिलाचा मृत्यू झाला आहे.

19:17 (IST)18 Apr 2020
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

16:56 (IST)18 Apr 2020
देशभरात ९९१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, करोनाग्रस्तांची संख्या १४ हजारांच्याही पुढे

देशभरात मागील चोवीस तासात ९९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३७८ इतकी झाली आहे. कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात १९९२ रुग्ण हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

15:54 (IST)18 Apr 2020
राज्यभरात १० हजाराहून जास्त वाहनं जप्त

लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १० हजार ७२९ गाड्या जप्त केल्या आहेत. तर ३३ हजार ९८४ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.  दरम्यान राज्यातील एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये आठ अधिकारी आहेत.

15:51 (IST)18 Apr 2020
‘…या भीतीचं द्वेषात रुपांतर होतं’; डॉक्टरांवर दगडफेक करणाऱ्यांवर शबाना आझमी बरसल्या

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात देशातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर आपलं काम करत आहेत. मात्र  रुग्णांसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले होताना दिसून येत आहे. काही ठिकाणी डॉक्टरांवर दगडफेकीदेखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी संताप व्यक्त केला आहे. पुढे वाचा...

15:31 (IST)18 Apr 2020
१२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत करणार ठाकरे सरकार

१२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. करोनाच्या संकटकाळात या मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन आहे. अशात या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके बसत आहेत ते मजूर वर्गाला. त्यांना काहीसा का होईना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्या सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही मदतीचा हात या सगळ्यांना दिला आहे.

14:35 (IST)18 Apr 2020
पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात ११ सदस्य असतील. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.

14:20 (IST)18 Apr 2020
सोलापुरात करोनाचा आणखी एक रुग्ण सापडला

सोलापुरात करोनाचा आणखी एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या एका मृतासह १४ झाली आहे. शहरात आतापर्यंत करोनाचे बहुतांशी रूग्ण तेलंगी पाच्छा पेठेतील आहेत. या भागात आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. आतापर्यंत सोलापुरात करोनाचे संशयित म्हणून एकूण ६६९ रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ४९० चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये आणखी १६५ रूग्णांचे करोना चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

14:14 (IST)18 Apr 2020
Video: …आणि हायवेवर गाड्या धावत असतानाच उतरले विमान

कॅनडाच्या पूर्वेला असणाऱ्या क्विबेक प्रांतामध्ये मागील एका महिन्याहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरु आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा करुन काही आठवडे उलटले आहेत. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर जंगलांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशामधील रस्त्यांवरील वाहतुक अगदीच कमी झाली आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या इतकी कमी झाली आहे की येथील एका हायवेवर चक्क एक लहान विमान उतरल्याची घटना समोर आली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

14:13 (IST)18 Apr 2020
‘जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी ३५ हजार द्या, आरोग्य सेतू डाउनलोड करा’; न्यायालयाचे आदेश

देशावर करोनाचे संकट असतानाच झारखंड उच्च न्यायलयाने एका प्रकरणामध्ये अगदीच आगळावेगळा निर्णय दिला आहे. भाजपाचे माजी खासदार सोम मरांडी यांच्यासहीत सहा लोकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र यासाठी न्यायलयाने अर्जदारांसमोर दोन अटी ठेवल्या. न्यायालयाने या सहा जणांना केंद्र सरकारचे ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाउनलोड करायला सांगितलं. तसेच कोर्टाने या सहा जणांनी करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीसाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये द्यावेत असंही स्पष्ट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

14:12 (IST)18 Apr 2020
मोबाईल विकून धान्य आणलं अन् घरातच गळफास लावून केली आत्महत्या

एक धक्कादायक प्रकार हरियाणामधील गुडगावमधून समोर आला आहे. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल हा ३५ वर्षीय कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र त्यानंतर घरात कोणीच नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास घेतला. येथे वाचा सविस्तर वृत्त

14:11 (IST)18 Apr 2020
ब्राझील: करोनावरुन राष्ट्राध्यक्ष आणि आरोग्यमंत्र्यामध्येच जुंपली; मतभेदामुळे आरोग्यमंत्र्यावर कारवाई

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. देशामध्ये करोनामुळे दोन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून देशावर करोनाचे संकट ओढावलेले असतानाच वैचारिक मतभेदांमुळे बोल्सोनारो यांनी देशाच्या आरोग्यमंत्र्यांनाच पदावरुन काढून टाकलं आहे. असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बोल्सोनारो यांच्या या निर्णयामुळे देशातील जनतेने संताप व्यक्त केला आहे.  येथे वाचा सविस्तर वृत्त

14:10 (IST)18 Apr 2020
लॉकडाउन विरोधात हाती AK-47 घेऊन अमेरिकन नागरिक उतरले रस्त्यावर

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेले शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र असं असतानाही येथील लॉकडाउन उठवण्याची मागणी काहीजणांकडून केली जात आहे. न्यूयॉर्कबरोबरच व्हर्जिनीयामध्ये काही तरुण हातामध्ये शस्त्र घेऊन ‘अ‍ॅण्टी लॉकडाउन प्रोटेस्ट’ म्हणजेच लॉकडाउनविरोधी आंदोलन करताना दिसले.येथे वाचा सविस्तर वृत्त

14:10 (IST)18 Apr 2020
लॉकडाउन विरोधात हाती AK-47 घेऊन अमेरिकन नागरिक उतरले रस्त्यावर

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेले शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र असं असतानाही येथील लॉकडाउन उठवण्याची मागणी काहीजणांकडून केली जात आहे. न्यूयॉर्कबरोबरच व्हर्जिनीयामध्ये काही तरुण हातामध्ये शस्त्र घेऊन ‘अ‍ॅण्टी लॉकडाउन प्रोटेस्ट’ म्हणजेच लॉकडाउनविरोधी आंदोलन करताना दिसले.येथे वाचा सविस्तर वृत्त

14:08 (IST)18 Apr 2020
धक्कादायक! कारवाई करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढले, शिवीगाळ करत जबर मारहाण

करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असल्याने कोणीही नियमांचं उल्लंघन करणार नाही यासाठी पोलीस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहे. मात्र अनेक ठिकाणी लोक नियम तोडत असून पोलीस कर्मचाऱ्यांवरच हात उचलत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना मानखुर्दमध्ये समोर आली आहे. अनधिकृतपणे फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना महिलांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी त्यांनी अश्लील भाषा वापरत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण फरार आहे. (सविस्तर वृत्त)

14:06 (IST)18 Apr 2020
मदतीच्या आशेवर असलेल्या पाकिस्तानला अमेरिका देणार ८४ लाख डॉलर

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने ८४ लाख अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी शुक्रवारी या मदतीची घोषणा केली. वाचा सविस्तर बातमी.

14:04 (IST)18 Apr 2020
अकोल्यात मृत व्यक्तीच्या मुलीला करोनाची लागण

अकोल्यात आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. मृताच्या मुलीला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

13:08 (IST)18 Apr 2020
सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर एडलवाइज कंपनीतर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनेकांनी सढळ हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत.

11:40 (IST)18 Apr 2020
संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’, जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून प्रत्येक देश आपापल्या परीने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी अशा देशांना सलाम ठोकत त्यांचं कौतुक केलं आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. (सविस्तर वृत्त)

11:39 (IST)18 Apr 2020
भारतात कुष्ठरोगावर प्रभावी ठरलेली लस करोना व्हायरसला रोखणार?

सध्या जगभरात करोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम वेगात सुरु आहे. भारतही यामध्ये मागे नाही. भारतीय शास्त्रज्ञ बहुउद्देशीय लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुष्ठरोगावर प्रभावी ठरलेली लस करोना व्हायरसवर सुद्धा परिणामकारक ठरु शकते का? त्या दृष्टीने भारतात संशोधन सुरु आहे. वाचा सविस्तर बातमी.

11:19 (IST)18 Apr 2020
अमरावती रिक्षाचालकाच्या मुलाला करोनाची लागण

अमरावती शहरातील नूराणी चौक येथील दोन दिवस आधी मृत पावलेल्या एका ऑटो चालक व्यक्तीच्या मुलाचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे.

10:49 (IST)18 Apr 2020
तबलिगी जमात आणि रोहिंग्यांचं कनेक्शन, गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांना अलर्ट

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना निर्वासित मुस्लीम रोहिंग्यांची माहिती मिळवत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. रोहिंग्या तबलिगी जमातच्या सदस्यांच्या संपर्कात आल्याचा संशय असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असून रोहिंग्या आणि तबलिगी जमातमधील संबंधांचा तपासस करण्यास सांगितलं आहे. सोबतच रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्यांशी संबंधित लोकांची करोना चाचणी करण्यासही सांगितलं आहे. यासंबंधी गरज असलेली सर्व पावलं उचला असा आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. (सविस्तर वृत्त)

10:26 (IST)18 Apr 2020
वुहानची 'ती' प्रयोगशाळा इंटेलिजन्सच्या रडारवर


चीनच्या वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून करोना व्हायरस बाहेर आला अशी जगभरात चर्चा आहे. वुहानची 'ती' प्रयोगशाळा आता इंटेलिजन्स एजन्सींच्या रडारवर असून तिथे नेमकं काय काम चालायचं, नोव्हेंबरमध्ये नेमकं काय घडलं त्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. वाचा सविस्तर बातमी.

10:16 (IST)18 Apr 2020
वसईत १३ नव्या रुग्णांची वाढ

नायगाव येथील पालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रातील ६ कर्मचारी करोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार नर्स, दोन वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. यासोबत वसई-विरारमधील करोनाबाधितांची संख्या ८१ वर पोहोचली आहे.

09:47 (IST)18 Apr 2020
कोल्हापूरात ४७ संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूरात शनिवारी ४७ संशयित करोनाबाधित रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी मिरज येथील लॅबमधून हे अहवाल प्राप्त झाले आहेत. यांपैकी ४७ चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचे सँपल पुन्हा पाठविण्यास सांगितले आहे.

09:41 (IST)18 Apr 2020
नागपूर : शहरात ४ नवे रुग्ण आढळले; २ वर्षीय बाळाचाही समावेश

नागपूर शहरात आणखी ४ नवे करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी तीन जण सतरंजीपुरा आणि एक करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्ती आहे. यामध्ये एका दोन वर्षीय बाळाचाही समावेश.

09:26 (IST)18 Apr 2020
औरंगाबादमध्ये करोनाचा तिसरा बळी

औरंगाबादमध्ये करोनाबाधित ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. गेल्या दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. यासोबत औरंगाबादमध्ये करोनाबाधित मृतांची संख्या तीन झाली आहे.

09:20 (IST)18 Apr 2020
नेपाळमधील १२ भारतीयांना करोनाची लागण

नेपाळमध्ये करोनाचे १४ रुग्ण सापडले असून यामधील १२ भारतीय आहेत. एकाच दिवसात जवळपास दुप्पट रुग्ण सापडल्याने नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या ३० वर पोहोचली आहे. याआधी नेपालमध्ये करोनाचे १६ रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली होती.

09:15 (IST)18 Apr 2020
देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजाराच्या पुढे, ४८० जणांचा मृत्यू

देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर पोहोचली आहे. तसंच मृतांची संख्या ४८० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जगभरातील करोनाबाधितांची संख्या २२ लाख ३१ हजार ४३८ वर पोहोचली आहे.

08:58 (IST)18 Apr 2020
राहुल गांधी यांचे मार्गदर्शन देशहिताचे, ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – शिवसेना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी यावेळी सरकारला काही सल्ले देत आपलं मत मांडलं. शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधींचं कौतुक केलं असून संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले असल्याचं म्हटलं आहे. करोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. (सविस्तर वृत्त)

08:53 (IST)18 Apr 2020
‘शक्य असेल ती सर्व मदत करु’, पंतप्रधान मोदींचा इजिप्त, दक्षिण आफ्रिकेला शब्द

करोना व्हायरसविरोधातील लढाईत भारत जगातील वेगवेगळया देशांना औषधांचा पुरवठा करत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. वाचा सविस्तर बातमी.