News Flash

Coronavirus : राज्यात दिवसभरात १११ रूग्णांचा मृत्यू, ३५ हजार ९५२ करोनाबाधित वाढले

राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संग्रहीत

राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे राज्य शासनासमोर करोना संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज २० हजार ४४४ रुग्ण देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 8:42 pm

Web Title: coronavirus 111 patients die in a day in the state msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ताडोबा : भरधाव कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
2 मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह
3 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
Just Now!
X