News Flash

Coronavirus : राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर! दिवसभरात १६,५७७ रूग्ण करोनामुक्त!

आज राज्यात २९५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद

संग्रहीत फोटो

राज्यातील करोना संसर्ग आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे रोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. मागील काही दिवसांपासून रोज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १६ हजार ५७७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १० हजार ८९१ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २९५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के एवढा आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 7:15 pm

Web Title: coronavirus 16 thousand 577 patients were cured in the state during the day and 10 thousand 891 new corona affected msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “राजकारणात जनता रिटेकची संधी देत नसते; अभिनयाकडे परत फिरा”; नवनीत राणांना खोचक सल्ला
2 “सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही”; मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं विधान
3 पॉलिटिक्सच्या खिचडीमुळे रद्द झालं जात प्रमाणपत्र, नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X