News Flash

Coronavirus : राज्यात दिवसभरात १६६ मृत्यू , ३५ हजार ७२६ करोनाबाधित वाढले

राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संग्रहीत

राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत व रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आता करोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करत आहे. शिवाय, येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी देखील घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज १४  हजार  ५२३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.५८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Coronavirus – राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईत उद्यापासून नाईट कर्फ्यू ; BMC चा महत्वाचा निर्णय

 मुंबई, पुणे, नागपूर नाशिक, औरंगाबाद सारख्या शहारांमध्ये मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. मुंबईतील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, आता मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात करोनाशी संबिधत घालण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 8:52 pm

Web Title: coronavirus 166 deaths 35 thousand 726 corona patients increased in a day in the state msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus – … अखेर औरंगाबादमध्ये लॉकडाउन घोषित
2 तो रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला, मी पहिली दोन पानंच दिली होती – फडणवीस
3 गुन्हा दाखल झाल्यावर फडणवीस घाबरलेत?; राष्ट्रवादीचा निशाणा
Just Now!
X