– प्रशांत देशमुख

करोनामूळे अडचणीत आलेल्या रशियातील भारतीय विद्यार्थांचा मायदेशी परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील. करोनामूळे अडचणीत आलेल्या रशियातील भारतीय विद्यार्थांचा मायदेशी परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील.  रशियातील विविध वैद्यकीय विद्यापिठात महाराष्ट्रातील हजारभर विद्यार्थी शिकायला असून त्यात विदर्भातील दीडशे विद्यार्थांचा समावेश आहे.

करोनामूळे रशियात रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असण्याच्या पाश्र्वाभूमीवर कठोर टाळेबंदी लागू आहे. अडकलेल्या विद्यार्थांना विदेशातील टाळेबंदी अत्यंत जाचक ठरत असल्याचे हे विद्यार्थी पालकांना रोज कळवितात. मात्र महाराष्ट्रात विमान उड्डाण करण्यास मनाई असल्याने परतीच्या प्रवासावर प्रश्नाचिन्ह उमटले होते. घायकुतीस आलेल्या या विद्याथ्र्यांची स्थिती लोकसत्तातून जगापूढे आल्यावर या परतीच्या प्रवासाबाबत मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतातील अन्य राज्याप्रमाणेच राज्याच्या अन्य विमानतळावर रशियातून थेट विमान पाठविण्याचा दाखला विद्यार्थांनी दिला होता. ही बाब आ.डॉ. पंकज भोयर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसेच भाजपाचे नेते अविनाश देव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडली.

गडकरी यांनी रशियातील भारतीय दुतावास तसेच विदेश मंत्रालयाकडे या संदर्भात विद्याथ्र्यांच्या परतीच्या प्रवासाबाबत पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनंतरच राज्यातील प्रवास शक्य होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या दृष्टीने पत्र व्यवहार झाला. अखेर संमती मिळाल्याने १७ जून रोजी १६८ विद्यार्थांना घेवून येणारे विमान दिल्लीला १८ जूनला पोहोचेल. त्यानंतर दिल्ली ते नागपूर असा प्रवास होणार असल्याचे एक पालक चंद्रशेखर लाजूरकर यांनी लोकसत्ताला सांगितले. पहिले सात दिवस त्यांना नागपूरातच संस्थात्मक विलगीकरणात राहण्याचे बंधन आहे.

केंद्र शासनाच्या विदेशातून भारतीयांना आणणाºया ‘वंदे मातरम’ या उपक्रमाअंतरर्गत होणारा हा प्रवास मात्र महागडा असल्याचे विवेक लाजूरकर याने रशियातून बोलताना आज नमूद केले. एरव्ही २० ते २५ हजार रूपयाचा प्रवास आता ५१ हजार रूपयांना पडणार आहे. तसेच विलगीकरणाचा खर्चही विद्याथ्र्यांनाच करावा लागणार आहे. मात्र खर्च ही दुय्यम बाब आहे. आमच्या संकटाला वाचा फोडणाºया लोकसत्ताला याचे विशेष श्रेय जाते. तसेच रशियन दुतावासातील बिनया श्रीकांत प्रधान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली मदत नाकारता येणार नाही, असे विवेकने आवर्जून नमूद केले. प्रवास नक्की झाला असला तरी प्रवासी विद्याथ्र्यांची नावे आज आम्ही दुतावासाकडे पाठविणार असल्याचे त्याने सांगितले.