राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्या संख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या ही सातत्याने जास्त अधिक आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. दरम्यान आज दिवसभरात राज्यात २१ हजार ८१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १० हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज करोनामुळे १५४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,६४,३४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.२५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.

· आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६६,९६,१३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,४२,००० (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,७४,३२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.