राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं सांगितलं जात असलं, तरी देखील अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधिता रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच आहे. तर, दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या ही कधी दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त, तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात २२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. तर, ६ हजार ९५९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ७ हजार ४६७ रूग्ण करोनातून बरे देखील झालेले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९०,७८६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) ९६.६२ टक्के एवढे झाले आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,०३,७१५  झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३२७९१ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७९,६७,६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७६,७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.