08 July 2020

News Flash

Coronavirus: जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर मशिदींमधून २४ जण तपासणीसाठी पुढे

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या कडेकोट जिल्हाबंदीनंतर आष्टीत एक जण करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला जावून आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी चोवीस तासांचा स्वतःहून समोर न आल्यास पोलीस कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला होता. कारवाईचा बडगा उगारताच बुधवारी शहरातील दोन मशिदींमधून परराज्यातून आलेले २४ जण तपासणीसाठी पुढे आले आहेत. मात्र, मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाशी त्यांचा संबंध नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या कडेकोट जिल्हाबंदीनंतर आष्टीत एक जण करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज या धार्मिक कार्यक्रमास जाऊन आले अथवा त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

कारवाईच्या भीतीने बुधवार (८ एप्रिल) रोजी शहरातील दोन मशिदींमधून २४ व्यक्तींनी पुढे येऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
एका मशिदीतून १३ तर दुसऱ्या मशिदीतून ११ असे २४ जण तपासणीसाठी पुढे आले होते. या व्यक्ती गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मशिदींमध्ये वास्तव्यास असून ते सर्वजण परराज्यातील असल्याने त्यांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीनंतर त्यांना मशिदींमध्ये पाठवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 9:05 pm

Web Title: coronavirus 24 people go out of mosque after giving warning by beeds collector aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 Exclusive मुलाखत : राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव – देवेंद्र फडणवीस
2 तबलिगीप्रकरणी राजकारण करू नका: देवेंद्र फडणवीस
3 तबलिगी मरकज : राज्याच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागितली आठ प्रश्नांची उत्तरे
Just Now!
X