दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला जावून आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी चोवीस तासांचा स्वतःहून समोर न आल्यास पोलीस कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला होता. कारवाईचा बडगा उगारताच बुधवारी शहरातील दोन मशिदींमधून परराज्यातून आलेले २४ जण तपासणीसाठी पुढे आले आहेत. मात्र, मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाशी त्यांचा संबंध नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या कडेकोट जिल्हाबंदीनंतर आष्टीत एक जण करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज या धार्मिक कार्यक्रमास जाऊन आले अथवा त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

कारवाईच्या भीतीने बुधवार (८ एप्रिल) रोजी शहरातील दोन मशिदींमधून २४ व्यक्तींनी पुढे येऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
एका मशिदीतून १३ तर दुसऱ्या मशिदीतून ११ असे २४ जण तपासणीसाठी पुढे आले होते. या व्यक्ती गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मशिदींमध्ये वास्तव्यास असून ते सर्वजण परराज्यातील असल्याने त्यांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीनंतर त्यांना मशिदींमध्ये पाठवण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 24 people go out of mosque after giving warning by beeds collector aau
First published on: 08-04-2020 at 21:05 IST