पालघर तालुक्यात बोईसर येथे सापडलेल्या 35 वर्षीय व्यक्तीच्या तसेच पालघर येथे 57 वर्षीय परिचारिकेच्या उच्च जोखीम संपर्कातील 40 ते 45 व्यक्तींचा अहवाल नकारात्मक आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील काही अहवाल प्रतीक्षेत असले तरी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बोईसर येथील एका 35वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील इतर तीन व्यक्तीला संसर्ग झाला होता. या सर्वांच्या उच्च जोखीम संपर्कातील अनेक व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या एका रुग्णालयात काम करणाऱ्या पालघर मिशन कंपाउंड येथील एका परिचारिकेचा सोबत प्रवास केलेल्या 11 प्रवाशांचा त्यांच्या उच्च जोखमीच्या संपर्कातील अधिकतर व्यक्तींचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्याची माहिती पुढे आली आहे. या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व डॉ. ढवळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा अहवाल नकारात्मक आल्याने मोठा दिलासा मिळला आहे.