राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ८४२ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ६२ हजार १९४ नवीन करोनाबाधित आढळले आहे. तर, ८५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४२,२७,९४० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.५४% एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८६,६१,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,४२,७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,२६,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३९,०७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Third Wave : आरोग्यमंत्री टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले…

राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं आहे.

लसीकरणात महाराष्ट्राची अव्वल कामगिरी! सर्वाधिक नागरिकांना मिळाले लसीचे दोन्ही डोस!

गेल्या काही दिवसांपासून करोना लसीचे अपुरे डोस हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या वादाचा मुद्दा ठरला आहे. त्यातच १ मेपासून केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची देखील घोषणा केली. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणासाठी पात्र ठरले. त्यामुळे राज्यात लसींचे डोस अपुरे पडू लागले आहेत. मात्र, तरीदेखील राज्यानं लसीकरणामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक नागरिकांना लसीकरण केल्याची बाब महाराष्ट्राच्या खात्यात जमा होती. आता लसीचे दोन्ही डोस मिळालेले सर्वाधिक नागरिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या बाबतीतही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आला आहे.