राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ८४१ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३ हजार ३९१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ८० करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२८,५६१ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,१८,५०२ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८४६९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६८,७४,४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,१८,५०२(११.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८३,४४५ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर १,८१२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४७,९१९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.