रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १ हजार ३८६ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

शनिवारी जिल्ह्यात ८२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५६, पनवेल ग्रामीणमधील ९, उरणमधील ४, खालापूर १, कर्जत २, पेण ८, तळामधील २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल पालिका हद्दीतील ३ तर तळा येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ४ हजार ५०९ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ३ हजार ०६८ जणांचे अहवाल नकारात्मक आले. तर १ हजार ३८६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ५५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत ८०२ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ५३४ करोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये पनवेल मनपा हद्दीतील २८०, पनवेल ग्रामीण हद्दीतील ६५, उरणमधील १५,  खालापूर ९, कर्जत १४, पेण १२, अलिबाग ३१,  मुरुड १३, माणगाव २६, तळा येथील ७, रोहा ५, सुधागड १, म्हसळा २७, महाड १०, पोलादपूर मधील ९ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ३७ हजार ८२५ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.