News Flash

Coronavirus – राज्यात आज ९ हजार ६८ रुग्ण करोनामुक्त, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधित

दिवसभरात २२ रूग्णांच्या मृत्युंची नोंद

संग्रहीत

राज्यातील करोनासंसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत, तर मृत्युंच्या संख्येतही भर सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये दररोज आठ हजारांच्या वर नवीन करोनाबाधित आढळले, काल ही संख्या ११ हजारांच्या वर पोहचली होती. करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा करोनाबाधितांचीच संख्या अधिक आढळून येत होती. मात्र आज अनेक दिवसानंतर दिवसभरातील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्यात आज ९ हजार ६८ रूग्ण करोनामुक्त झाले असुन, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, २२ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ९७ हजार ६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.२१ टक्के एवढे झाले आहे. तर ,सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६९,३८,२२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,२८,४७१ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४१,७०२ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४,०९८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 8:40 pm

Web Title: coronavirus 9 thousand 68 patients were cured from corona in the state today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “महाविकासआघाडीचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ”
2 …अन्यथा सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार – राजू शेट्टी
3 सरकारच्या दृष्टीने मराठवाडा, विदर्भ, खान्देशात तज्ज्ञ मंडळी नाही का?- राम कुलकर्णी
Just Now!
X