News Flash

Coronavirus: डिपॉझिट जप्त झालेल्या बिचुकलेंचा थेट पंतप्रधानांना सल्ला, म्हणाले…

'मी तुम्हाला एक महत्वपूर्ण सल्ला देत आहे', असं म्हणत बिचुकलेंनी मोदींना पाठवलं पत्र

बिचुकलेंचा थेट पंतप्रधानांना सल्ला

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत दंड थोपटून दारुण पराभूत झालेले बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सल्ला दिला आहे. बिचुकले यांनी पंतप्रधानांना पाठवलेलं हे पत्र सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

बिचुकलेंनी मोदींना पाठवलेल्या पत्रामध्ये यंदाचे संपूर्ण शैक्षिणक वर्ष शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश मोदींनी द्यावेत असं म्हटलं आहे. कवी मनाचे नेते, सातारा लोकसभा तसेच वरळी विधानसभा अपक्ष नेता असा स्वत:चा उल्लेख करत बिचुकले यांनी मोदींना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये शाळा सुरु केल्यास त्या माध्यमातून करोनाचा धोका वाढू शकतो अशी भिती बिचुकलेंनी व्यक्त केली आहे.

बिचुकलेंचे पत्र जसेच्या तसे…

संपूर्ण जगामध्ये करोनामुळे चिंतेंचे वातावरण आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना करोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळेच मी तुम्हाला एक महत्वपूर्ण सल्ला देत आहेत. १५ वर्षे किंवा त्या खालील वयाची मुले ही भारताचे भविष्य आहेत. या वयामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा परिस्थितीमध्य जोपर्यंत करोना संसर्गाची साखळी तुटत नाही किंवा जोपर्यंत यावरील औषध किंवा लस मिळत नाही तोपर्यंत देशभरामध्ये कमीत कमी सर्व शाळा आणि कॉलेजेस पुढील वर्षापर्यंत म्हणजेच मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवा. शाळेत जाणारी मुलं गावातील असो किंवा शहरातील ती लहान असतात. ते शिकण्याबरोबर खेळतील, मस्ती करतील. त्यांचे वयच मस्ती करण्याचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. शाळा कॉनव्हेंटची असो किंवा महानगरपालिकेची शाळेतील वर्गांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. १०० टक्के खात्री सांगू शकतो की यामुळे करोनाचा संसर्ग वाढणार. त्यामुळेच शालेय वयातील मुलांच्या पिढीबद्दल असा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. माझी सूचना मान्य करुन संपूर्ण देशातील शाळा सन २०२०-२०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश द्या.

तसेही अनेक राज्यांमध्ये नववीपर्यंत नापास न करण्याची पद्धत आहे. त्यामुळे माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. होम स्कुलींग म्हणजेच घरीच शिक्षण देण्याचा प्रयोग पूर्ण वर्षभर केल्यास भारताच्या भविष्याला म्हणजेच मुलांना करोनापासून दूर ठेवणं शक्य होणार होईल.


असं पत्र पहिल्यांदाच नाही…

बिचुकले यांचा वरळी मतदारसंघामधून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. उमेदवाराला एकूण मतदानाच्या १६.६ टक्के मतं मिळाली नाहीत तर डिपॉझिट जप्त केलं जातं. त्याप्रमाणे अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरुन झालेल्या अभूतपूर्व राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बिचुकलेंनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन होतं. इतकचं नाही तर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचेही म्हटले होते. त्यावेळीही बिचुकले चांगलेच चर्चेत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 6:00 pm

Web Title: coronavirus abhijeet bichukle letter to pm modi saying close school till march 2021 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “कोणी पाच कोटी दिलेत कोणी ५०० कोटी दिलेत आम्ही…”; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची भावनिक पोस्ट
2 Viral Video: राष्ट्रीय महामार्गावर आराम करणारा बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
3 घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेतील टॉप शंभर स्पर्धकांपैकी आणखी २५ जणांची तिसरी यादी जाहीर
Just Now!
X