News Flash

साताऱ्यात करोना ओसरला; रुग्णसंख्येत मोठी घट

रुग्ण निष्पन्नतेच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुप्पट ते अडीच पट राहिल्याने उपचाराधीनांची संख्या तब्बल निम्म्याने घटली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

यंत्रणेसह जनतेला मोठा दिलासा

कराड : सातारा जिल्ह्यातील करोना महासाथीचा संसर्ग अगदीच उताराला लागला आहे. ताज्या माहितीनुसार आज बुधवारी गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढ तर काल मंगळवारी सर्वात कमी रुग्ण निष्पन्नता वेग राहिल्याने शासकीय यंत्रणेसह जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची नेमकेपणाने माहिती देताना, करोना संसर्ग आणखी कमी होईल असा विश्वास दिला आहे.

मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत करोना संशयित म्हणून चाचण्या तपासण्या केलेल्या ७,७९२ जणांपैकी बाधित म्हणून ८७२ (११.१९ टक्के) निष्पन्न तर, काल हीच संख्या ८,९७० जणांपैकी बाधित म्हणून ८७५ (९.७५ टक्के) निष्पन्न झाले आहेत.

रुग्ण निष्पन्नतेच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुप्पट ते अडीच पट राहिल्याने उपचाराधीनांची संख्या तब्बल निम्म्याने घटली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील दिवसभरातील रुग्णवाढ २,७०० समीप पोहोचताना रुग्ण निष्पन्नता दर ४५ टक्क्यांवर गेला होता. सध्या ही भयावह स्थिती निवळली असून, रुग्णवाढ आणखी घटणार असल्याने त्यासाठी लोकांनी निर्बंध पाळून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, सक्त टाळेबंदीत सूट दिली असली, तरी लोकांनी नियम, निर्बंधांचा कटाक्ष पाळणे बंधनकारकच आहे आणि तसे न झाल्यास दंडासह कायदेशीर कारवाई होणारच, असा इशारा या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:58 am

Web Title: coronavirus cases fall in satara district zws 70
Next Stories
1 दीड महिन्यांपूर्वी प्राणवायूसाठी धावाधाव; आता ३३ निर्मिती प्रकल्प!
2 बीड जिल्ह्यात मृत्युदर चढाच; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
3 जिवंत व्यक्तीलाच करोनाने मृत झाल्याचा निरोप !
Just Now!
X