05 August 2020

News Flash

Coronavirus: चंद्रपुरात पोलिसांनी छापा टाकत ११ रशियन नागरिकांना घेतलं ताब्यात, होम क्वारंटाइनमध्ये ठेवलं

चंद्रपूरमध्ये करोनाचा संसर्ग पसरवू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे

संग्रहित छायाचित्र

चंद्रपूरमध्ये करोनाचा संसर्ग पसरवू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. परदेश तसंच इतर राज्यांमधूनल आलेल्यांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांना रशियामधील ११, दिल्ली, ओडिसा व केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १४ जण मशिदीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. या १४ व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रामनगर पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. होते.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगात करोनाने थैमान घातलं आहे. देशासह राज्यात दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सर्व जिल्हा, राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. परदेश तसंच दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वारंटाइनमध्ये रहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार देण्यात येत आहेत.

मात्र, येथील तुकुम परिसरातील एका मशिदीत रशियातील ११, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १४ व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १४ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना वन अकादमी येथे होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 11:08 pm

Web Title: coronavirus chandrapur 11 foreigners sent for home quarantine sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 आज आहे गुढीपाडवा, कोरोनाला आडवा अन्…; रामदास आठवलेंनी केली कविता
2 सोलापुरात अंधश्रध्देला ऊत, करोना रोखण्यासाठी अंगणात लावले दिवे
3 Coronavirus :महाराष्ट्रातील सात तुरुंगामधले कैदी शिवत आहेत मास्क
Just Now!
X