News Flash

संसर्गाचा वेग वाढला; देशात फक्त २४ तासात ९०९ जणांना करोना

महाराष्ट्र, देश आणि विदोशातील करोना संदर्भातील Live Update ...

करोना व्हायरस या महामारीमुळे जगातील परिस्थिती दिवसेंदिवस आणखीच भयानक होत आहे. अमेरिकेत मृत्यूचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. तर जगातील मृत्यूची संख्या लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात आणि भारतात करोना व्हायरस समुह संसर्गाच्या दारापाशी पोहचला आहे. देशभरात गेल्या २४ तासांत आणखी ९०९ जणांना करोनाची लागण झाली असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८३५६ वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २७३ वर पोहोचली आहे. करोना व्हायरस संबधित प्रत्येक अपडेट इथं पाहूयात…

Live Blog
21:06 (IST)12 Apr 2020
तुळजाभवानी मंदिर आणि 'झेडपी' मदतीसाठी सरसावले पुढे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या अभूतपूर्व संकटातून सावरण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून पाच हजार तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा हजार जीवनाश्यक वस्तूच्या संचाचे वाटप केले जाणार आहे. हातावर पोट असणारे मजूर, निराधार आणि गोरगरिबांना तुळजाभवानी मंदिर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा आधार मिळणार आहे. तेल, मीठ, तांदूळ, गहू, साखर, डाळ आशा जीवनाश्यक वस्तूंच्या १५ हजार संचाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

20:52 (IST)12 Apr 2020
नवी मुंबईत ४ नव्या करोनाबाधित रुग्णांची भर, नेरुळमध्ये एकाचा मृत्यू

नवी मुंबईत आज ४ करोनाबाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे शहरात एकूण रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. तर आज नेरुळमधील एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

20:22 (IST)12 Apr 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा पहिला बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाग्रस्त व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या ४ दिवसांपासून या रुग्णावर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरातील एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली असून यांपैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

19:59 (IST)12 Apr 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये नर्सला करोनाची लागण, पतीही बनला करोनाग्रस्त

पुण्यात एक नर्स करोनाबाधित आढळली असून तिच्या पतीला देखील करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बधितांचा आकडा २८ वर पोहचला आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

18:45 (IST)12 Apr 2020
सोलापुरात करोनाचा पहिला बळी

आतापर्यंत करोनामुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात थोड्याच वेळांपूर्वी एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शहरातील जोडबळण्णा चौकात राहणाऱ्या व्यक्तीचा करोनाने बळी घेतल्यानंतर तेथील संपूर्ण परिसरात पोलिसांनी क्षेत्र प्रतिबंधित केले आहे.

18:30 (IST)12 Apr 2020
राज्य सरकारचा निर्णय : नववी आणि ११वी च्या परीक्षा रद्द, दहावीच्या भूगोल, कार्यशिक्षणचेही पेपर रद्द

करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा...

18:20 (IST)12 Apr 2020
देशात आतापर्यंत ९० डॉक्टर्स, नर्सेसना करोना

देशात करोना रुग्णांना बरे करण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टर, नर्सेसनाच करोना होण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. आता पर्यंत देशात ९० डॉक्टर्स, नर्सेसना करोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

18:11 (IST)12 Apr 2020
सोलापूर : लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर काम सुरु; अपघातात तीन मजुरांचा मृत्यू

लॉकडाउनच्या काळातही सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात रस्त्यावर प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरु असताना अचानक अपघात होऊन त्यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. 

18:00 (IST)12 Apr 2020
करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ : मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले १९७ कोटी रुपये

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा...

17:59 (IST)12 Apr 2020
देशात फक्त २४ तासात ९०९ जणांना करोना

देशातील करोनाच्या संसर्गाचा वेग वाढल्याची जाणीव करून देणारी आकडेवारी समोर आली आहे. मागील २४ तासात देशात ९०९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे. तसेच या कालावधीत ३४ जणांना मृत्यू झाला असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

17:54 (IST)12 Apr 2020
CoronaVirus : अमेरिकेसह या १३ देशांसाठी भारत बनला 'संजिवनी'; लाखो गोळ्या पाठवणार

ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे १३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा...

17:24 (IST)12 Apr 2020
पुण्यात ३० नर्स क्वारंटाइन

पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलच्या एका ४५ वर्षांच्या नर्सला करोना झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात असलेल्या ३० नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती रुबी हॉल हॉस्पिटलचे आरोग्य सेवा संचालक संजय पाठारे यांनी दिली.

14:42 (IST)12 Apr 2020
पोलिसांना पीपीई किट; शर्मिला ठाकरे यांच्याकडून वाटप सुरू

राज्यात लॉकडाउनच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला करोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचंही समोर आलं. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. शर्मिला राज ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील पोलिसांना पीपीई किटचं वाटप करण्यात आलं. 

14:41 (IST)12 Apr 2020
नागपूर : एकाच दिवशी १४ करोना रुग्ण वाढले

नागपूरमध्ये एकाच दिवशी १४ करोना रुग्ण वाढले आहेत. मेयो या रुग्णालयात ६ तर मेडिकलच्या प्रयोगशाळेत ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील मेयोत पॉझिटिव्ह आढळलेले ४ जण दिल्लीतील मरकजला जाऊन आलेले होते. 

14:41 (IST)12 Apr 2020
पंजाब, महाराष्ट्र, दिल्लीत लॉकडाऊनचा कालावधी वाढला, आयपीएलचं काय होणार??

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली महत्वाची माहिती, वाचा सविस्तर

14:06 (IST)12 Apr 2020
वसई : नालासोपाऱ्यात रविवारी २ नवे रुग्ण आढळले

वसईतील नालासोपाऱ्यात रविवारी २ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथली रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. यामध्ये आजवर सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांमध्ये वसईत १५, नालासोपाऱ्यात १६ आणि विरारमध्ये ७ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आणि जसलोक रुग्णालयाच्या किचन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. आज त्याच्या पत्नी आणि मुलीला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

13:59 (IST)12 Apr 2020
महाराष्ट्रात १३४ नवे रुग्ण, करोना फास आवळतोय

महाराष्टारीत करोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

13:05 (IST)12 Apr 2020
पुण्यात दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू

पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय, या दोन्ही महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिलांना करोना शिवाय इतर आजार देखील होते.

12:53 (IST)12 Apr 2020
गुजरातमध्ये अडकले ९०० ब्रिटिश नागरीक, येणात तीन खास विमान

भारतात लॉकडाउन सुरू झाल्यापासून आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यापासून गुजरातमध्ये ९०० ब्रिटिश नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी परत नेण्यासाठी आता तीन विशेष विमान पाठवण्यात येणार आहेत. 

12:35 (IST)12 Apr 2020
मालेगावमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

देशासह राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मालेगावामध्ये आज तब्बल 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण अगोदर करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले होते.

12:05 (IST)12 Apr 2020
आता फारकाळ घरात राहु शकत नाही, युजवेंद्र चहल लॉकडाउनला कंटाळला

युजवेंद्र चहलला नेमकी कसली चिंता सतावते आहे, जाणून घ्या सविस्तर...

10:35 (IST)12 Apr 2020
नागपूरमध्ये करोनाचे दोन हॉटस्पॉट

नागपूरमधील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हे दो भाग करोनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे आता कोणीही येऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. परिसराच्या सर्व मार्गांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १७६१ करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

10:19 (IST)12 Apr 2020
चिंताजनक : भारतातील मृत्यूदर चीन-अमेरिका आणि जर्मनीपेक्षाही जास्त

करोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. पण सुरूवातीच्या आकड्यांचं विश्लेषण केल्यास भारतामध्ये मृत्यूदराचं प्रमाण या देशांपेशा जास्त असल्याचं समोर आले आहे... सविस्तर वाचा

10:19 (IST)12 Apr 2020
चिंताजनक : भारतातील मृत्यूदर चीन-अमेरिका आणि जर्मनीपेक्षाही जास्त

करोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. पण सुरूवातीच्या आकड्यांचं विश्लेषण केल्यास भारतामध्ये मृत्यूदराचं प्रमाण या देशांपेशा जास्त असल्याचं समोर आले आहे... सविस्तर वाचा

10:16 (IST)12 Apr 2020
करोनाचा ट्रॅकर

10:12 (IST)12 Apr 2020
मुंबईतील धारावी झोपडपट्टीत आणखी १५ करोना रुग्ण

आशियातील सर्वांत दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या धारावीतील करोना रुग्णांचा आकडा रोज वाढतोच आहे. रविवारी या झोपडपट्टीतील करोना रुग्णांची संख्या १५ ने वाढली आहे. आतापर्यंत या झोपडपट्टीत एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

10:05 (IST)12 Apr 2020
करोनामुळे आर्थिक संकट, रघुराम राजन म्हणतात मी सरकारला मदत करायला तयार !

लॉकडाउनचा भारतीय अर्थव्यस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक कंपन्या या काळात बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. याचसोबतच लॉकडाउनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे, शेतकरी यांच्यावरही परिणाम होत आहे. अशा खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास आपण मदत करायला तयार असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. वाचा सविस्तर बातमी

10:03 (IST)12 Apr 2020
झारखंडमध्ये दुसरा करोना बळी

झारखंडमध्ये रविवारी एका ५६ वर्षीय करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी या राज्यात एका ७२ वर्षांच्या करोना रुग्णांच मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

09:57 (IST)12 Apr 2020
नागपूरमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह करोना रुग्ण

नागपूरमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी आणखी दोन पॉझिटिव्ह करोना रुग्ण आढळले आहेत. ते आमदार निवास येथे विलगिकरणात होते. हे दोघेही मरकजच्या यादीत होते. 

09:50 (IST)12 Apr 2020
Coronavirus : अमेरिकेत थैमान, 24 तासांत 1920 बळी

सध्या जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने अक्षरशा थैमान घातले आहे. सध्या याचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गत 24 तासांत एकट्या अमेरिकेत करोनामुळे तब्बल 1 हजार 920 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

09:20 (IST)12 Apr 2020
करोनाशी लढा : भारताचा फुटबॉलपटू करतोय हेल्पलाईन सेंटरवर काम

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद पडलेल्या आहेत. भारतामध्येही बीसीसीआयपासून सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. खेळाडू कोणताही असतो त्याच्यासाठी मैदान हे त्याचं घरच असतं. मात्र सध्याच्या खडतर काळात भारताचा फुटबॉलपटू सी.के.विनीतने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. विनीत केरळ सरकारच्या करोनाविरुद्ध हेल्पलाईन सेंटरवर नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करतोय. वाचा सविस्तर बातमी

09:04 (IST)12 Apr 2020
वरुण धवनच्या कुटुंबातील सदस्याला करोनाची लागण

करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यात भारताचाही समावेश आहे. अनेक सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत बऱ्याच जणांना याची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवनच्या कुटुंबातील सदस्यांना देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुढे वाचा...

08:57 (IST)12 Apr 2020
Coronavirus : देशभरात 24 तासांत 34 मृत्यू, 909 नवे रुग्ण

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांत देशात करोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला तर 909 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 8356 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 7367 रुग्ण,  उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले716 जण व मृत्यू झालेल्या 273 जणांचा समावेश आहे.

08:55 (IST)12 Apr 2020
राज्यात करोनाबाधितांचा आकडा 1761 वर

राज्यात काल दिवसभरात कोरोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1761 पोहचली आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 
08:52 (IST)12 Apr 2020
महाराष्ट्रासह चार राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन

भारतामधील करोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून चार राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, ओदीशा, पंजाब आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे.

08:51 (IST)12 Apr 2020
Coronavirus : राज्यात करोनाबाधितांचा आकडा 1761 वर

राज्यात काल दिवसभरात कोरोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1761 पोहचली आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाशी लढा : भारताचा फुटबॉलपटू करतोय हेल्पलाईन सेंटरवर काम
2 चिंताजनक : भारतातील मृत्यूदर चीन-अमेरिका आणि जर्मनीपेक्षाही जास्त
3 खासगी प्रयोगशाळांत विनामूल्य चाचणीला विरोध
Just Now!
X